AC Safety Tips For Monsoon : पावसाळ्यात एसी वापरावा का? जर वापरत असाल तर अशी घ्या काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

How to maintain AC in Monsoon: पावसाळ्यात दमट हवेमुळे एसी वापरणे गरजेचे ठरते. योग्य काळजी घेतल्यास एसीचा वापर सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरू शकतो.
Is it good to Use air conditioner during monsoon and essential AC tips for rainy season
Is it good to Use air conditioner during monsoon and essential AC tips for rainy seasonesakal
Updated on

How to Avoid AC Damage in Rainy Weather: पावसाळा म्हणजेच गारवा, दमटपणा आणि थोडीशी ओलसर हवा. पावसाळ्यात बहुतेक घरांमध्ये नैसर्गिक गारवा मिळतो. पण काही ठिकाणी हवा इतकी दमट आणि चिकट असते की एसी (AC) वापरणे गरजेचे बनते . परंतु, अनेकांना प्रश्न पडतो पावसाळ्यात एसी वापरावा का? आणि वापरायचा असल्यास, काय काळजी घ्यावी?

पावसाळ्यात एसी वापरावा का?

पावसाळ्यातही एसी वापरणे योग्य आहे, विशेषतः जिथे दमटपणा जास्त असतो. या हंगामात हवेत आर्द्रता (humidity) खूप वाढलेली असते, ज्यामुळे घाम जास्त येतो आणि त्वचा चिकट वाटते. एसी केवळ हवा थंड करत नाही, तर ती कोरडीही करतो म्हणजेच हवेतून आर्द्रता शोषून घेतो. यामुळे खोलीतील वातावरण छानले फ्रेश बनते.

Is it good to Use air conditioner during monsoon and essential AC tips for rainy season
Rainy Season Health Tips: आता पावसात सर्दी-खोकल्याला करा बाय-बाय, 'हे' घरगुती उपाय करा आणि मोकळा श्वास घ्या!

पावसाळ्यात एसी वापरताना घ्यावयाची काळजी (टिप्स)

1. डिह्युमिडिफायर मोड वापरा
अनेक आधुनिक एसीमध्ये ‘Dry Mode’ किंवा डिह्युमिडिफायर मोड असतो. हा मोड पावसाळ्यासाठी बेस्ट आहे. हा मोड खोलीतील ओलसरपणा कमी करून हवेला कोरडे आणि थंड ठेवतो.

2. फिल्टर्स नियमित स्वच्छ करा
पावसाळ्यात हवेतील धूळ, बुरशी आणि सूक्ष्मजंतू वाढू शकतात. त्यामुळे एसीचे फिल्टर स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक 15 दिवसांनी फिल्टर काढून धुणे किंवा ब्लोअरने साफ करणे गरजेचे आहे.

3. तापमान योग्य राखा
थंड हवामान आणि पावसामुळे वातावरण आधीच गार असते. त्यामुळे एसी चालवताना तापमान 24–26°C दरम्यान ठेवा. यामुळे वीज वाचेल आणि अचानक तापमान बदलामुळे सर्दी,खोकलाही होणार नाही.

Is it good to Use air conditioner during monsoon and essential AC tips for rainy season
Rainy Tour : पावसाळी भटकंती करताना... अशी घ्या काळजी

4. वेळेवर सर्व्हिसिंग करणे आवश्यक
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एसीची सर्व्हिस करून घ्या. यात ड्रेनेज पाइप, कंडेन्सर आणि फिल्टर्स नीट तपासले जातात. पावसाळ्यात अडथळे झाले की एसीमधून पाणी गळू शकते किंवा दुर्गंधी येऊ शकते.

5. खोली योग्यरित्या बंद ठेवा
एसी वापरताना खिडक्या आणि दरवाजे नीट बंद ठेवावेत. अन्यथा बाहेरून येणारी ओलसर हवा एसीवर ताण आणते आणि थंडी कमी वाटते.

6. विजेची काळजी घ्या
पावसाळ्यात विजेचे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सॉकेट, वायरिंग आणि प्लगची स्थिती योग्य आहे की नाही, हे तपासून पाहा. सर्ज प्रोटेक्टर वापरणे अधिक सुरक्षित ठरते.

7. हवा पुनर्निर्मिती (Air Circulation) करा
एसी चालू असताना अधूनमधून खिडकी उघडून ताजी हवा खोलीत येऊ द्या. यामुळे हवा बंदिस्त न राहता वातावरणात ताजेपणा राहतो.

Is it good to Use air conditioner during monsoon and essential AC tips for rainy season
Rainy Season Diet Tips: पावसाळ्यात एका तासापेक्षा जास्त वेळ ठेवलेले अन्न कधीही खाऊ नका, नाहीतर...

पावसाळ्यात एसी वापरणे पूर्णतः सुरक्षित आणि फायदेशीर आहे विशेषतः दमट हवामानात. मात्र योग्य काळजी घेतल्यास एसीचा वापर आरामदायक आणि खर्चिक न ठरता फायद्याचा ठरतो. आम्ही दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास पावसाळ्यात एसीचा चांगल्या प्रकारे वापर करून वीजबिलही वाचवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com