
Siddharth Nandyala AI App : फक्त १४ वर्षांच्या भारतीय वंशाच्या सिद्धार्थ नंद्याला याने अमेरिकेतील टेक व मेडिकल सर्कलमध्ये क्रांति घडवणारे अॅप तयार केले आहे. हे अॅप आहे Circadian AI. फक्त ७ सेकंदाच्या हार्ट साउंड रेकॉर्डिंगवरून हृदयविकार ओळखणारे हे अॅप, आज जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या कमाल अॅपसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांनीही सिद्धार्थचे कौतुक केले आहे.
सिद्धार्थने तयार केलेले हे अॅप हॉस्पिटलमध्ये वापरण्यासाठी असून, फक्त ७ सेकंदात हृदयाच्या ठोक्याचे विश्लेषण करून ४० पेक्षा जास्त प्रकारच्या हृदयविकारांची शक्यता दर्शवते. याची अचूकता ९६% असून भारत आणि अमेरिकेत मिळून १५ हजारहून अधिक रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे.
GGH विजयवाडा आणि GGH गुंटूरमध्ये हजारो रुग्णांवर अॅपची चाचणी झाली असून, यामध्ये ECG व इकोच्या मदतीने अंतिम निदान सिद्ध झाले. यामुळे हे अॅप सुरुवातीच्या तपासणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
Oracle आणि ARM कडून AI सर्टिफिकेट मिळवणारा सिद्धार्थ हा जगातील सर्वात तरुण AI सर्टिफाइड प्रोफेशनल आहे. त्याला US House of Representatives, Frisco Chamber of Commerce यांच्याकडून पुरस्कार व सन्मानपत्रे मिळाली आहेत.
“AI जर फायनान्स किंवा मार्केटिंगमध्ये बदल घडवू शकते, तर मग आरोग्य क्षेत्रात का नाही?” असा विचार करत सिद्धार्थने केवळ ७ महिन्यांत Circadian AI तयार केले. त्याचा विश्वास आहे की, "Innovation is the heartbeat of progress."
सिद्धार्थने यापूर्वी STEM IT नावाने एक शैक्षणिक स्टार्टअप सुरू केले असून तो विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी शिकवण्यासाठी विशेष साधने तयार करतो. टेक्नॉलॉजीशिवाय तो उत्तम गोल्फर आणि बुद्धिबळपटूही आहे.
भारतातून अमेरिकेत गेलेल्या सिद्धार्थने AI च्या मदतीने आरोग्यसेवेत क्रांती घडवण्याची सुरुवात केली आहे. ओबामा, बायडेन आणि चंद्राबाबू नायडूंसारख्या नेत्यांकडून मिळालेलं कौतुक हे केवळ सिद्धार्थचं नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.