फोन चार्ज करणारा स्केटबोर्ड !

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

स्केटिंग करणाऱ्या बहुतांश जणांना गाण्यांची आवड असते. आता अशा सर्व स्केटर्ससाठी आनंदाची बातमी आहे. जॉर्न वॅन डेन हौट या विद्यार्थ्याने बिल्ट-इन स्पीकर्स असलेला"चार्ज बोर्ड'हा स्केट बोर्ड बनवला आहे.

पदवीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रॉटरडॅम येथील "विल्यम डे कुनिंग ऍकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन'या संस्थेत त्याने हा प्रोजेक्‍ट केला. या चार्ज बोर्ड मध्ये मोबाईल फोन किंवा म्युझिक प्लेअर ठेवण्यासाठी जागा आहे. गाणी सुरू असतानाच चाकांपासून निर्माण होणाऱ्या गतीज ऊर्जेवर फोनची बॅटरीदेखील चार्ज करणे शक्‍य होईल.

सलग एक तास स्केटिंग केल्यास त्यातून निर्माण झालेल्या ऊर्जेवर मोबाईल फोन पूर्ण पणे चार्ज होऊ शकतो. जॉन म्हणाला,""मला या चार्ज बोर्डमध्ये आणखी थोडी सुधारणा करून तो सर्वांसाठी उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी मला तंत्रज्ञांची; तसेच गुंतवणूकदारांची मदत हवी आहे. मी नुकताच पदवीधर झालो आहे आणि या व्यवसायात
उतरण्याएवढी माझी आर्थिक कुवत नाही. सध्या या चार्ज बोर्डवर "आयफोन' तसेच 3.5 मिलिमीटरचे हेडफोन आणि 2.0 यूएसबी जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
यूएसबी वापरून आपण आणखी काही गॅजेटसुद्धा जोडू शकतो

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: skateboard charge smartphone