स्काईप व्हिडिओ कॉलवर बॅग्राऊंड कसे ब्लर करावे ? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स 

Skype for Android Updated With Background Blur, Improved Custom Reactions Picker
Skype for Android Updated With Background Blur, Improved Custom Reactions Picker

कोल्हापूर - स्काईप युजर्ससाठी नवीन अपडेट आणत आहे. ज्यामध्ये अँड्राईड युजर्ससाठी स्काईपवर व्हिडिओ कॉल दरम्यान बॅग्राऊंड बदलण्याचे फिचर आहे. हे फिचर IOS सोबत डेस्कटॉप युजर्सनाही उपलब्ध आहे. अँड्राईड युजर्ससाठी स्काईप ८.६८ हे अपडेट मिळत आहे. 

व्हिडिओ कॉलदरम्यान फोकस फक्त तुमच्यावरच ठेवायचा असेल, तर बॅग्राऊंड ब्लर करू शकता. तुमच्याजवळ जर मीटिंगमध्ये किंवा ऑनलाईन क्‍सासमध्ये सहभागी होण्यासाठी चांगली जागा नसेल तर त्यावेळी बॅग्राऊंड ब्लर करण्याचे फिचर्स कामी येते. याआधी हे फिचर्स सर्व युजर्ससाठी उपलब्ध नव्हते; परंतु आता अपडेट झाल्यानंतर हे फिचर्स सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. माइक्रोसॉप्ट ही अँड्रॉईडच्या वेगळ्या स्काईपसाठी नव्या फिचर्सवर काम करत आहे. दुसरीकडे आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी स्काईपमध्ये काही बदल अरणार आहेत. युजर्ससाठी डार्क आणि इतर फिचर्स लेटस्ट वर्जन ८.६८ समाविष्ट होतील. 

स्काईप व्हिडिओ कॉलदरम्यान असे बदला बॅग्राऊंड 
तुमचा व्हिडिओ कॉल सुरू असताना चूज बॅग्राऊंड इफेक्‍टवर क्‍लिक करा. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाला ब्लर करू शकता. यामध्ये तुम्ही पहिल्यापासून फोटो निवडू शकता. त्यानंतर पहिल्यांदा वापरलेला फोटो सहभागी करू शकता. याशिवाय बॅग्राऊंड ब्लर करण्यासाठी नवीन फोटोही घेऊ शकता. त्यासाठी पहिल्यापासूनच हे फोटो पाहण्यासाठी चूज कॅटॅगरीच्या आत मोर मेनू सिलेक्‍ट करा. यामध्ये लॅडस्कॅपमध्ये फोटो वापरू शकता आणि कस्टम फोटोसाठी पहिल्यांदा तुम्ही डेस्कटॉपवर सेव्ह करणे आवश्‍यक आहे. 


स्काईपमध्ये सर्व व्हिडिओ कॉलसाठी Windows, Mac आणि Linux ध्ये कसे ब्लर करणार? 

सर्व प्रथम तुमच्या फ्रोफाईल फोटोवर क्‍लिक करा. त्यानंतर सेटिंग बटनवर क्‍लिक करा आणि ऑडिओ व व्हिडिओ बटनवर क्‍लिक करा. चूज बॅग्राऊंड इफेक्‍टमध्ये तुम्हाला पाहिजे त्या बॅग्राऊंडला ब्लर करू शकता. 

स्काईप व्हिडिओ कॉलमध्ये आयफोन, आयपॅड आणि अँड्रॉईडसाठी बॅग्राऊंला ब्लर करता येते. त्यासाठी व्हिडिओ कॉरदरम्यान मोर मेनूवर क्‍लिक करा आणि ब्लर माय बॅग्राऊंड स्वीच चालू करा. 

अँड्राईड 8.68: 
बॅग्राऊंड ब्लर फिचर ऍक्‍टिवेट करण्यासठी युजर्सला या स्टेपस्‌ फॉलो कराव्या लागतील. 

तुमच्या कोणत्याही कॉन्टॅक्‍टसोबत व्हिडिओ कॉल सुरू करा. 
तुमच्या कॉल स्क्रीनवर टॉपला डाव्या बाजूला ऑडिओ आणि व्हिडिओ सेटिंग मेनू उघडून गियर आयकॉनवर क्‍लिक करा. 
आता तुम्हाला पॉप अप मेनू दिसेल. येथे हे फिचर्स ऑन करण्यासाठी ब्लर माय बॅग्राऊंड टॉगलवर क्‍लिक करा. 
ब्लर बॅग्राऊंडसोबत तुमच्या व्हिडिओ कॉलवर परत येण्यासठी मेनू बंद करा. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com