छोट्या घरांसाठी "ट्रान्सफॉर्मेबल फर्निचर'

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

घरांच्या किमती वाढल्याने त्यांचा आकार कमी होऊ लागला आहे. उपलब्ध जागेत अधिकाधिक सामान बसण्यासाठी कल्पक फर्निचरची गरज निर्माण झाली आहे. त्यातूनच फोल्डेबल, मल्टिपर्पज फर्निचर वापरण्याकडे अधिक कल वाढला. अमेरिकेतील "एमआयटी' संस्थेतील संशोधकांनी छोट्या घरांसाठी आकार बदलता येणारे "सिटीहोम' फर्निचर तयार केले आहे. त्यांनी या फर्निचरच्या मदतीने 200 वर्ग फुटांचे घर त्याच्या तिप्पट मोठे बनवले आहे. ""आमच्या फर्निचरमुळे एका बेडरूमचे रूपांतर जिम, लिव्हिंग रूम, 14 जणांची डिनर पार्टी, ऑफिस स्पेस, मीटिंग रूममध्ये करता येऊ शकते. हे फर्निचरचे आवाज आणि हावभावांच्याइशाऱ्यावर होते.

घरांच्या किमती वाढल्याने त्यांचा आकार कमी होऊ लागला आहे. उपलब्ध जागेत अधिकाधिक सामान बसण्यासाठी कल्पक फर्निचरची गरज निर्माण झाली आहे. त्यातूनच फोल्डेबल, मल्टिपर्पज फर्निचर वापरण्याकडे अधिक कल वाढला. अमेरिकेतील "एमआयटी' संस्थेतील संशोधकांनी छोट्या घरांसाठी आकार बदलता येणारे "सिटीहोम' फर्निचर तयार केले आहे. त्यांनी या फर्निचरच्या मदतीने 200 वर्ग फुटांचे घर त्याच्या तिप्पट मोठे बनवले आहे. ""आमच्या फर्निचरमुळे एका बेडरूमचे रूपांतर जिम, लिव्हिंग रूम, 14 जणांची डिनर पार्टी, ऑफिस स्पेस, मीटिंग रूममध्ये करता येऊ शकते. हे फर्निचरचे आवाज आणि हावभावांच्याइशाऱ्यावर होते. तुम्ही फर्निचरसमोर उभे राहून हात ओढल्यासारखा मागे घेतल्यावर बेड, किचन टेबल किंवा डायनिंग टेबल बाहेर येतो. सिटीहोम ही काळाची गरज आहे. हे फर्निचर लवकरच बाजारात उपलब्ध होईल,'' असे संशोधक केंट लार्सन यांनी स्पष्ट केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Small houses "transaphormebal furniture '