स्मार्टफोन्समुळे कळणार पदार्थाची गुणवत्ता

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

लंडन - सध्या लहानमुलांपासून सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन्स असतात. त्यामुळे स्मार्टफोनच्या टेक्नॉलॉजीत रोज नवनवीन बदल होत असातात. यात पुढचे पाऊल म्हणजे, स्मार्टफोनच्या सहाय्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासता येणार आहे. एवढेच नाही तर, काही आरोग्य चाचण्यादेखील करण्याची सोय अशा प्रकारच्या फोनमध्ये उपलब्ध होणार आहे. 

या नवीन स्मार्टफोन्समध्ये 'हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा'चा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी अशा कॅमेराची किंमत खूपच जास्त असल्याने फक्त वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रातच याचा वापर होत असे.

अशाप्रकारच्या टेक्नॉलॉजीमुळे विविध पदार्थांचे गुणधर्म जाणून घेऊन, त्याचे विश्लेषण करण्याची सोय देखील उपलब्ध होणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smartphone cameras may soon monitor health, food quality