फक्त 10 मिनिटांत स्मार्टफोनचं चार्जिंग होणार फुल्ल; येतेय नवीन टेक्नॉलॉजी

mobile charging technology
mobile charging technology

नवी दिल्ली - प्रत्येकाच्या हातात सध्या स्मार्टफोन दिसतो. फोन घेताना ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामध्ये कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर, रॅम, स्टोरेज यांचा समावेश असतो. यात बॅटरी जास्त असलेला फोन घेण्याकडं लोकांचा कल दिसतो. कारण चार्जिंग संपल्यामुळे फोन वापरताना अनेकदा अडचणी येतात. सतत चार्जिंग करण्याची कटकट नको असते. हीच समस्या सोडवण्यासाठी अनेक कंपन्या नवीन टेक्नॉलॉजी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता दहा मिनिटात बॅटरी फुल्ल होईल अशा टेक्नॉलॉजीवर शाओमी कंपनी काम करत आहे. कंपनी त्यांच्या आगामी फोनमध्ये ही सुविधा देण्याची शक्यता आहे. 

Xiaomi सध्या 200W फास्ट चार्जिंग सिस्टिमवर काम करत आहे. या वर्षाअखेरपर्यंत अशी सिस्टिम असलेला स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. शाओमीने जर ही सिस्टिम लाँच केली तर स्मार्टफोनच्या जगात ही एक क्रांती असेल.

कंपनीचा प्लान आहे की, 200W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग दिलं जाईल. यासाठी सुरुवातीला कंपनीने Mi 10 मध्ये 120W वायर्ड चार्जिंग सिस्टिम दिली होती.  तसंच 55W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंग सिस्टमही दिली होती. हे सर्व मिळून 185W होते. विशेष म्हणजे या टेक्नॉलॉजीची चर्चा अशावेळी सुरु आहे की अनेक कंपन्या त्यांच्या फोन बॉक्समध्ये चार्जर किंवा इतर अॅक्सेसिरीज देणं बंद करत आहेत. 

फास्ट चार्जिंगशिवाय सध्या या क्षेत्रात फोल्डेबल फोनची चर्चा आहे. शाओमी सध्या फोल्डेबल फोन तयार करण्यावर काम करत आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटर्रनल फोल्डिंग डिझाइन देण्यात येणार आहे. अद्याप कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

शाओमीने एक रिमोट चार्जिंग टेक्नॉलॉजी Mi Air Charge सादर केले आहे. या टेक्नॉलॉजीमुळे कोणतीही केबल कनेक्ट न करता एकाचवेळी अनेक डिव्हाइसला वायरलेस चार्जिंग करता येऊ शकतं. या टेक्नॉलॉजीमध्ये सेल्फ डेव्हलप्ड आयसोलेटेड चार्जिंग पाइलचा वापर केला जातो. ज्यामुळे चार्जिंगसाठी हवेत चार्जिंग एनर्जी बीम बाहेर फेकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com