Mobile Launch June 2025 : जून महिना मोबाईल प्रेमींसाठी एकदम खास! लाँच होणार 'हे' 5 दमदार स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत बघाच..

June 2025 Smartphone Launch : जून २०२५ मध्ये 5 स्मार्टफोन लाँच होणार आहेत. परफॉर्मन्स, बॅटरी, कॅमेरा आणि किंमत सर्व माहिती पाहा एका क्लिकवर.
June 2025 Smartphone Launch
June 2025 Smartphone Launchesakal
Updated on

Mobile Launch June 2025 : स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? पण तुमच्या पैशाला योग्य मोबदला मिळावा असं वाटतंय? तर या जूनमध्ये काही नवीन लॉन्च झालेले आणि काही किंमतीत घट झाल्यामुळे आणखी आकर्षक ठरलेले असे पाच स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. वेगवान प्रोसेसर, दमदार बॅटरी, जबरदस्त कॅमेरे आणि उत्कृष्ट स्क्रीन हे सगळं तुम्हाला या फोन्समध्ये बजेटनुसार मिळणार आहे. चला तर पाहूया या महिन्यातील ‘व्हॅल्यू फॉर मनी’ स्मार्टफोन्सची यादी.

1. CMF Phone 2 Pro

किंमत: 18,999 रुपायांपासून
का घ्यावा: कमी बजेट असले तरी फीचर्सची कमतरता नाही. 50MP टेलिफोटोसह ड्युअल कॅमेरा, 5000 निट्स ब्राइट AMOLED डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, आणि 33W फास्ट चार्जिंग. Dimensity 7300 Pro प्रोसेसर आणि ३ वर्षांचे Android अपडेट्ससह ६ वर्षांची सुरक्षा अपग्रेडस उपलब्ध.

2. iPhone 16e

किंमत: 53,000 रुपायांच्या आसपास
का घ्यावा: A18 चिपसह (iPhone 16 सारखीच), हे iPhone मॉडेल Apple Intelligence फिचर्सला सपोर्ट करतं. MagSafe किंवा Ultra-wide कॅमेरा नसला तरी, उत्तम परफॉर्मन्स, पॉलिश्ड युजर अनुभव, आणि जास्त वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात.

June 2025 Smartphone Launch
Amazon Pink Dot : ऑनलाइन खरेदी करताय? मग अ‍ॅमेझॉनचं ‘पिंक डॉट’ काय आहे माहिती असायलाच हवं! आत्ताच जाणून घ्या

3. Samsung Galaxy S24

6.2-इंच LTPO AMOLED स्क्रीन (120Hz, HDR10+), Exynos 2400 चिप, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स. बॅटरी आयुष्य थोडं मर्यादित असलं तरी कॉम्पॅक्ट आणि प्रीमियम फोन हवा असलेल्यांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

4. Nothing Phone 3a Pro

किंमत: 35,000 रुपायांच्या आत
का घ्यावा: ट्रान्सपॅरंट बॅक आणि Glyph लाइट्सने हा फोन युनिक दिसतो. यामध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर, 12GB RAM आणि 50MP मुख्य सेन्सरसह पेरिस्कोप लेन्स असलेली ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. 6.77-इंच AMOLED स्क्रीन 3000 निट्स ब्राइटनेससह कोणत्याही प्रकाशात वापरण्यायोग्य आहे.

June 2025 Smartphone Launch
Shubhanshu Shukla : तारीख पे तारीख! भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांची अंतराळ मोहिम पुढे ढकलली, 'या' तारखेला होणार ऐतिहासिक उड्डाण

5. iQOO 13

किंमत: 60,000 रुपायांच्या आत
का घ्यावा: जर तुम्हाला गेमिंग, मल्टीटास्किंग, किंवा हाय परफॉर्मन्स हवा असेल, तर iQOO 13 हा फोन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. Snapdragon 8 Elite चिपसह येणारा हा Android मधील आत्ताचा सर्वात वेगवान प्रोसेसर असलेला फोन आहे. 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह, 16GB RAM आणि 6000mAh बॅटरी यामुळे वापरात कमालीचा अनुभव मिळतो. 120W फास्ट चार्जिंगची सुविधा तुम्हाला ० ते १००% चार्ज फक्त ४० मिनिटांत देते.

तुमचं बजेट, गरज आणि प्राधान्य लक्षात घेऊन वरील यादीतील कुठलाही फोन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. गॅमिंगसाठी iQOO 13, स्टाईलसाठी Nothing 3a Pro, बजेटमध्ये सर्व काही हवंय तर CMF 2 Pro, iOS वापरायचंय तर iPhone 16e आणि कॉम्पॅक्टपणा हवा तर Galaxy S24 हे सगळे फोन तुमच्या प्रत्येक गरजेवर फिट बसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com