Realme GT 2 Pro भारतात लॉन्च; जाणून घ्या फोनची किंमत, फीचर्स

smartphone launch realme gt 2 pro launched in india check price features and specifications here
smartphone launch realme gt 2 pro launched in india check price features and specifications here

Realme GT 2 Pro स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. कंपनीने हा फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये जानेवारीमध्ये आणि युरोपमध्ये फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता. Realme 9 4G हँडसेट लॉन्च देखील Realme GT 2 Pro सह लॉन्च करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची खासियत काय आहे ते..

Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 2 Pro मध्ये 1440×3216 पिक्सेल रिझोल्यूशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह 6.7-इंचाचा LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये पेपर टेक मास्टर डिझाइन देण्यात आले आहे. फोन पंच-होल कॅमेरा कटआउटसह येतो आणि फोनची सर्वोच्च ब्राइटनेस 1,400 nits आहे. स्मार्टफोनचे LTPO AMOLED पॅनल 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश दर मिळजो. ज्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर 1Hz ते 120Hz रिफ्रेश रेटमध्ये स्विच करण्यास मदत करते. स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर Realme GT 2 Pro मध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. याशिवाय 65W सुपरडार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 12 आधारित UI 3.0 वर काम करतो.

smartphone launch realme gt 2 pro launched in india check price features and specifications here
Maruti लवकरच लॉन्च करणार 'ही' नवीन कार; जाणून घ्या काय असेल खास

स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा

Realme GT 2 Pro स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50MP Sony IMX766 प्रायमरी सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2Mp मॅक्रो शूटर दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, या स्मार्टफोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. या फोनची जाडी 8.18mm आणि वजन 189 ग्रॅम आहे.

smartphone launch realme gt 2 pro launched in india check price features and specifications here
शिवसेनेचं मुंबईत उद्या शक्तिप्रदर्शन; राऊतांचं होणार स्वागत

फोनची किंमत किती आहे?

हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे - 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज. फोनच्या 8GB RAM + 128GB मॉडेलची किंमत 49,999 रुपये आहे आणि 2GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 57,999 रुपये आहे. Realme GT 2 Pro स्टील ब्लॅक, पेपर ग्रीन आणि पेपर व्हाइट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

smartphone launch realme gt 2 pro launched in india check price features and specifications here
कोरोनाचा व्हेरिएंट XE भारतात दाखल! जाणून घ्या नेमकी काय आहेत लक्षणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com