कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Realme Narzo 50, मिळतील जबरदस्त फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smartphone launch realme narzo 50 launch 24 February 2022 check price and all features

कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Realme Narzo 50, मिळतील जबरदस्त फीचर्स

Realme Narzo 50 Launch : Realme चा नवीन बजेट स्मार्टफोन Realme Narzo 50 लवकरत लॉन्च होणार असून नुकतीच यांची लॉंच डेक कन्फर्म करण्यात आली आहे. Realme Narzo 50 लाँचसाठी Amazon India वर लिस्ट करण्यात आले आहे. फोनची विक्री Amazon India वर होणार असून हा स्मार्टफोन MediaTek Helio G96 चिपसेट सपोर्टसह लॉंच केला जाऊ शकतो. हाय रिफ्रेश रेट सपोर्ट आणि मोठ्या बॅटरीसह फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील यामध्ये दिला जाऊ शकतो.

Realme Narzo 50 चे स्पेसिफिकेशन्स

Realme चा हा बजेट स्मार्टफोन Realme Narzo 50 येत्या 24 फेब्रुवारी 2022 ला लॉन्च होणार आहे. दरम्यान या Realme Nazro 50 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले सपोर्ट दिला आहे. फोनला हाय रिफ्रेश रेट सपोर्ट तसेच पंच-होल सपोर्ट दिला जाईल. Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये Helio G96 चिपसेट दिला जाऊ शकतो. या फोनचे दोन स्टोरेज व्हेरिएंट 4GB आणि 6GB रॅम लॉंच होण्याटी शक्यता आहे. तर यासोबत 64 GB आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सपोर्ट मिळेल

हेही वाचा: दररोज 3GB डेटा, डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह सर्वात स्वस्त प्लॅन

Realme Narzo 50 स्मार्टफोनची बॅटरी

EEC सूचीनुसार, Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी सपोर्ट मिळेल सोबत फोन 33W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करेल. हा फोन Android 11 आधारित RealmeUI 3.0 वर चालतो. Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा म्हणून 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच 2MP डेप्थ सेन्सर आणि मायक्रो सेन्सर सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP सेंसर मिळेल.

हेही वाचा: Wi-Fi 7 दुप्पट स्पीड देणार, पण Wi-Fi 7 नेमकं आहे काय? जाणून घ्या

Realme Narzo 50 ची अपेक्षित किंमत

Realme Narzo 50 4 GB RAM आणि 64 GB स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 15,990 रुपयांना लॉन्च केला जाऊ शकतो. तर Realme Narzo 50 चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांना ऑफर केला जाऊ शकतो. Realme Narzo 50 स्मार्टफोन ग्रे आणि ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा: आता पेट्रोल-डिझेल चिंता सोडा, Renault घेऊन येतेय हायड्रोजन कार

Web Title: Smartphone Launch Realme Narzo 50 Launch 24 February 2022 Check Price And All Features

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
go to top