Smartphones Launch : या आठवड्यात लॉन्च होऊ शकतात 'हे' स्मार्टफोन, वाचा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smartphones launch in this week smartphones launched in sep 2022 check details here

Smartphones Launch : या आठवड्यात लॉन्च होऊ शकतात 'हे' स्मार्टफोन

Smartphones Launch : सप्टेंबरच्या संपूर्ण महिन्यात अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. पण महिन्याच्या सुरुवातीच्या या आठवड्यात अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. या आठवड्यात 4 वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 10 स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यापैकी 5 स्मार्टफोन एकट्या Apple लाँच करू शकतs. याशिवाय Redmi 3 स्मार्टफोन, Reality 1 आणि Poco देखील त्यांचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत.

हे स्मार्टफोन याच आठवड्यात लाँच होणार आहेत

Poco M5 - Poco 5 सप्टेंबर रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Poco M5 लॉन्च करणार आहे. फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6nm MediaTek Helio G99 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. यात 6.58 इंच फुल एचडी + डिस्प्ले मिळेल. मोबाईलचा रिफ्रेश दर 90 Hz आहे. हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप सह लॉन्च होणार आहे.

Redmi 11 Prime 5G- Redmi 6 सप्टेंबर रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Redmi 11 Prime 5G लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह उपलब्ध असेल. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोनमध्ये 50 MP चा डुअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देखील दिली जाऊ शकते.

हेही वाचा: Apple iPhone: 7 तारखेला होणार iphone 14 लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफिकेशन

Redmi 11 Prime 4G- Redmi 6 सप्टेंबर रोजी भारतात त्याची 4G व्हर्जन Redmi 11 Prime 4G लाँच करेल. या फोनमध्ये 50 MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या फोनमध्ये MedaiTek Helio G99 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळू शकते.

Redmi A1- या दोन फोनशिवाय, कंपनी 6 सप्टेंबर रोजी भारतात आणखी एक नवीन फोन Redmi A1 लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी उपलब्ध असेल. फोन MediaTek प्रोसेसरसह सादर केला जाईल. लेदर टेक्‍चर डिझाईनसह हा फोन काळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगात बाजारात येईल.

Realme C33- Realme देखील 6 सप्टेंबर रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme C33 लॉन्च करणार आहे. फोनमध्ये 50 MP ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी उपलब्ध असेल, यासोबतच कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी 37 दिवसांपर्यंत स्टँडबाय देईल. हा फोन ब्लू, ब्लॅक आणि गोल्डन कलरमध्ये येईल.

हेही वाचा: Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

iPhone 14 सिरीज- Apple 7 सप्टेंबर रोजी Apple इव्हेंटमधून iPhone 14 सिरीज लॉन्च करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या सीरिजमधून आपले 4 ते 5 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. ज्यामध्ये iPhone 14, iPhone 14 Mini, iPhone 14 Pro, iPhone 14 Max/ Plus आणि iPhone 14 Pro Max/ Plus चा समावेश आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता Apple Event सुरू होईल. या इव्हेंटमध्येApple Watch Pro, Apple Watch 8 Pro आणि नवीन आयपॅड देखील लॉन्च करू शकते.

Web Title: Smartphones Launch In This Week Smartphones Launched In Sep 2022 Check Details Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology