

What is SMS Blaster Scam and How It Works Scammers Force 5G/4G to 2G Downgrade
esakal
तुमच्या फोनवर कधी 4G किंवा 5G सिग्नल अचानक गायब होऊन फक्त 2G दिसतो का? बहुतेक लोक हे कमकुवत नेटवर्क म्हणून दुर्लक्ष करतात. पण ही खरी समस्या नाही. सायबर क्रिमिनल हे जाणीवपूर्वक करतात. ते 'SMS ब्लास्टर' किंवा 'IMSI कॅचर' नावाचे छोटे उपकरण वापरतात. हे उपकरण खऱ्या मोबाइल टॉवरसारखे दिसते आणि 500 मीटरच्या आत येणाऱ्या फोनला जबरदस्तीने 5G/4G वरून असुरक्षित 2G नेटवर्कवर स्विच करवते.