Snapchat AI Features : आता स्नॅपचॅटमध्येही करता येणार मेसेज एडिट; एआयच्या मदतीने मिळणार कित्येक नवे फीचर्स.. जाणून घ्या

Snapchat New Features : आता कोणत्याही इमोजी द्वारे मेसेजवर रिअ‍ॅक्ट करता येणार आहे. याव्यतिरिक्त एआयच्या मदतीने नवीन रिमाईंडर फीचरही स्नॅपचॅटमध्ये देण्यात येणार आहे.
Snapchat AI Features
Snapchat AI FeatureseSakal

Snapchat New AI Features : तरुणांमध्ये लोकप्रिय असणारं मेसेजिंग अ‍ॅप स्नॅपचॅट हे आता आणखी स्मार्ट होणार आहे. या अ‍ॅपमध्ये आधीपासूनच कित्येक वेगळे फीचर्स उपलब्ध होते. मात्र आता या फीचर्सना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची साथ लाभणार आहे. स्नॅपचॅटच्या नव्या अपडेटमध्ये हे फीचर्स रोलआऊट होतील. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी हे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. (Snapchat Update)

मेसेज करता येणार एडिट

स्नॅपचॅटच्या नव्या अपडेटमध्ये मिळणारं सर्वात आकर्षक फीचर म्हणजे, मेसेज एडिटिंग. व्हॉट्सअ‍ॅपवर ही सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे. मात्र आता स्नॅप यूजर्सनाही पाठवलेला मेसेज पाच मिनिटांच्या आत एडिट करता येणार आहे.

याव्यतिरिक्त एआयच्या मदतीने नवीन रिमाईंडर फीचरही स्नॅपचॅटमध्ये देण्यात येणार आहे. 'माय एआय रिमाइंडर्स' (My AI Reminder) हे फीचर तुम्हाला आगामी कार्यक्रमाची आठवण करुन देईल. यासोबतच एखादा मेसेज पाठवून तुम्ही 'इन-अॅप काउंटडाऊन' (In app countdown) देखील सेट करू शकणार आहात.

Snapchat AI Features
Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

बिटमोजीचा लुक करा कस्टमाईज

फक्त इतकंच नाही तर, AI च्या मदतीने तुमच्या 'बिटमोजी'चा लुकही आता कस्टमाइज करता येणार आहे. 'व्हायब्रंट ग्राफिटी' (Vibrant Graffiti) किंवा 'स्कल फ्लॉवर' (Skull Flower) सारखे वेगवेगळे फॅब्रिक पॅटर्न निवडता येतील.

यासोबतच स्नॅपचॅट लेन्स (Snapchat lenses) मध्येही AI चा वापर करण्यात आला आहे. नवीन 90's AI लेन्स फिल्टर' तुमच्या सेल्फीला (Snap selfie) 90च्या दशकातील फोटोमध्ये बदलून टाकेल!

याशिवाय आता कोणत्याही इमोजी द्वारे मेसेजवर रिअ‍ॅक्ट करता येणार आहे. तसेच मित्रांनी Snap Map वर लोकेशन शेअर केल्यास, ते तुमच्या एरियामध्ये असतील तर 'वेव्ह' (wave) पाठवून त्यांचं लक्ष वेधता येणार आहे.

Snapchat AI Features
Tata Upcoming Cars : 'टाटा'चीच गाडी घ्यायची असेल तर थोडं थांबा.. लवकरच येतायत तीन नव्या SUV; नवा इलेक्ट्रिक पर्यायही मिळणार

इतके नवीन फीचर्स असताना, त्यांच्या वापरावर काही प्रमाणात मर्यादा देखील आहेत. काही फीचर्स फक्त स्नॅपचॅट+ सब्सक्रिप्शन (Snapchat Plus Subscription) घेतलेल्या वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहेत. पण या नवीन अपडेटमुळे स्नॅपचॅटचा अनुभव आणखी स्मूथ आणि मनोरंजक बनणार यात शंका नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com