सोशल मीडिया नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही: IT मंत्रालय | Social Media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media
सोशल मीडिया नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही: IT मंत्रालय | Social Media

सोशल मीडिया नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही: IT मंत्रालय

कोणतीही सोशल मीडिया कंपनी नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणू शकत नाही, इंटरनेट हे सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाण असायला हवं आणि सर्व प्लॅटफॉर्म त्यांच्या वापरकर्त्यांना जबाबदार आहेत, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (IT Ministry) अधिकाऱ्यांनी सोमवारी ही म्हटलं आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंपन्यांनी मनमानी करून माहिती काढून टाकल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हे सांगितले आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या एका वर्गात असंतोष वाढत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांचा कंटेंट काढून टाकतात, असा त्यांचा आरोप आहे. (Social Media cannot infringe on constitutional rights of citizens)

हेही वाचा: ऐश्वर्या रजनीकांतनं अखेर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं हटवलं धनुषचं नाव

सूत्रांनी सांगितले की विनामूल्य, सुरक्षित, विश्वासार्ह आणि जबाबदार इंटरनेटसाठी मंत्रालय वचनबद्ध आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही लवादाला, मग तो मोठा असो वा छोटा, भारतीय असो की विदेशी, त्याला भारतीय नागरिकांच्या मूलभूत आणि घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही.

हेही वाचा: Elon Musk सुरू करणार नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म? ट्वीटरवर दिले संकेत

सूत्रांनी सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि नियंत्रकांनी वेळोवेळी लागू असलेल्या सर्व कायद्यांचा आणि नियमांचा आदर केला पाहिजे. इंटरनेट हे सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाण असले पाहिजे आणि सर्व मध्यस्थ वापरकर्त्यांना जबाबदार असले पाहिजेत.

Web Title: Social Media Cannot Infringe On Constitutional Rights Of Citizens It Ministry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..