E-Luna : वाहतुकीसाठी ‘ई-लुना’ सर्वोत्तम पर्याय; एका चार्जिंगमध्ये ११० किलोमीटर धावणार

मजबूत बांधणीमुळे ई-लुना १५० किलोपर्यंतचा भार सहन करू शकत असल्याने दैनंदिन प्रवासापासून ते वितरणापर्यंत विविध गरजांसाठी हा एक व्यावहारिक पर्याय आहे.
e-Luna
solution to rising cost of fuel for transport affordable personal transport launch e-LunaSakal

Pune News : वाहतुकीसाठी इंधनाचा वाढता खर्च आणि परवडणाऱ्या वैयक्तिक वाहतुकीचा अभाव या समस्येवर उपाय म्हणून ‘कायनेटिक ग्रीन’ने ‘ई-लुना’चा (इलेक्ट्रिक व्हेईकल) पर्याय उपलब्ध केला आहे.

बाजारपेठेतील महागड्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत अधिक स्टायलिश आणि मजबूत ‘ई-लुना’ प्रतिमहिना २,५०० रूपयांपेक्षा कमी हप्त्यात उपलब्ध होऊ शकते. ती ७९,९९० रुपये (एक्स शोरूम पुणे) किमतीत उपलब्ध आहे.

एका चार्जिंगमध्ये ती ११० किलोमीटर धावते. याचा खर्च १० पैसे प्रती किलोमीटर आहे. यासोबतच मजबूत बांधणीमुळे ई-लुना १५० किलोपर्यंतचा भार सहन करू शकत असल्याने दैनंदिन प्रवासापासून ते वितरणापर्यंत विविध गरजांसाठी हा एक व्यावहारिक पर्याय आहे.

e-Luna
Sunita Williams to Space : आजच तो ऐतिहासिक क्षण; भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स अंतराळात घेणार झेप, कुठे पाहाल लाईव्ह प्रक्षेपण?

विशेष म्हणजे ई-लुना ही पाच वर्षांच्या विस्तारित वॉरंटीसह उपलब्ध आहे. समाजातील सर्व घटकांसाठी आर्थिक संधीची दारे खुली करणारी ई-लुना हे ‘ईव्ही’ क्रांतीमधील भारताच्या आत्मनिर्भरता व क्षमतेचा पुरावा आहे. ‘ईव्ही’ केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक नसून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारीही असू शकते, हे ई-लुनाने सिद्ध केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com