मोबाईल संबंधित या खास गोष्टी माहिती आहेत का? नक्की जाणून घ्या

वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन बर्‍याच कंपन्या खास फीचर्स असणारे नवीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येत आहेत
mobile phones
mobile phones

मोबाइल फोन हा सध्याच्या जगात अविभाज्य घटक बनला आहे, फोबाईल फोनशिवाय एक दिवसही काढणे आजच्या काळात शक्य होणार नाही. याचाच फायदा घेत सगळ्यांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन बर्‍याच कंपन्या खास फीचर्स असणारे नवीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येत आहेत. महत्वीची गोष्ट म्हणजे वेगाने बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाशी जोडलेले राहण्यासाठी लोक हे स्मार्टफोन खरेदी देखील करतात. आपण स्मार्टफोन विकत घेताना त्याची किंमत आणि फीचर्सविषयी पूर्ण माहिती घेतो. पण मोबाइल फोनशी संबंधित असे बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आपल्याकडे नसतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना मोबाईल संबंधित महत्वाच्या गोष्टी माहित नसतात आज आपण अशाच काही महत्वाच्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.

पहिला मोबाइल फोन आणि पहिला कॉल?

स्मार्टफोनच्या आधी बाजारात मोबाइल आला, ज्यामध्ये वापरकर्त्यांना फक्त कॉलिंग आणि मेसेज करण्याची सुविधा होती. तसेच जगातील पहिली मोबाइल फोन बनवणारी कंपनी ही मोटोरोला होती. या कंपनीने त्यांचा पहिला फोन 1983 मध्ये लाँच केला, ज्याचे नाव होते मोटोरोला Motorola DynaTAC 8000x. या जगातल्या फोनची किंमत सुमारे 2 लाख रुपये इतकी होती. जगातील पहिला मोबाइल बनल्यानंतर १२ वर्षांनी भारतात पहिल्यांदा मोबाइल फोन आणण्यात आला. 31 जुलै 1995 रोजी भारतात मोबाइल क्रांती घडली. पहिला फोन सुखराम जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्योती बासू यांना केला. ज्योती बसू त्यावेळी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी सुखराम जी आपल्या देशाचे केंद्रीय दूरसंचार मंत्री होते. भारताचा पहिला मोबाइल 31 जुलै 1995 रोजी भारतीय उद्योगपती भूपेंद्र कुमार मोदी यांची कंपनी ‘Modi Telstra ने लाँच केला. भारताची पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी ‘Modi Telstra होती आणि त्यांची सेवा मोबाइल नेट म्हणून ओळखली जात असे. याच नेटवर्कवर पहिला मोबाइल कॉल केला गेला. ‘Modi Telstra हा मोदी ग्रुप ऑफ इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा टेलिकॉम कंपनी टेलस्ट्र्रा यांचे जॉइंट व्हेंचर होते.

भारतात स्मार्टफोनचा कधी आला अन् तो कोणत्या कंपनीचा होता?

आजकाल बाजारात बर्‍याच स्मार्टफोन कंपन्या आहेत आणि विशेष म्हणजे स्मार्टफोन कंपन्यांसाठी भारतात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे जगभरातील शेकडो कंपन्या भारतात दाखल झाल्या आहेत आणि त्यांचे स्थान प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यात जोरदार चढाओढ सुरु आहे. मात्र या सगळ्यांच्या आधी भारतातील पहिला मोबाइल फोन 22 ऑक्टोबर 2008 ला लाँच करण्यात आला होता आणि तो बाजारात आणणारी कंपनी होती एचटीसी HTC आणि कंपनीने हा Android स्मार्टफोन HTC t-Mobile G1 लॉन्च केला होता, ज्याला एHTC Dream म्हणूनही ओळखले जाते.

जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन

मोबाईल फोनच्या जगात जेथे मोठ्या स्क्रीन स्मार्टफोनची चर्चा आहे, तेथे एक फोन त्याच्या आकाराबद्दल वापरकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. जगातील सर्वात छोटा फोन यूके कंपनी Kingstarter लॉन्च केला होता आणि त्याचे नाव होते Zanco Tiny t1 . या स्मार्टफोनचा आकार क्रेडिट कार्डइतका आहे आणि त्याचे वजन केवळ 13 ग्रॅम आहे.

हा होता जगातील पहिला टच स्क्रीन फोन…

जगातील पहिली टच स्क्रीन फोन हा संगणक चिप बनविणारी कंपनी IBM ने लॉन्च केला होता त्याचे नाव IBM Simon ठेवले गेले. हा टच स्क्रिन फोन 1992 मध्ये लाँच केला गेला होता. परंतु लोकांसाठी हा फोन बाजारात 1994 मध्ये लाँच करण्यात आला होता. त्याची किंमत $ 900 म्हणजेच सुमारे 68 हजार रुपये होती.

मोबाइल किती प्रकारचे असतात?

मोबाईल बाजारात तीन नावांनी ओळखला जातो ज्यामध्ये सेल फोन, फीचर फोन आणि स्मार्टफोन ही नावे आहेत. सेल फोन हा कीपॅड असलेला मोबाईल फोन आहे आणि तो फक्त कॉल करण्यासाठी वापरला जातो. त्यात कोणतेही अतिरिक्त फीचर्स उपलब्ध नाहीत. आजच्या काळात, त्याचा वापर नगण्य आहे. तर दुसरे नाव फोन आहे ज्यामध्ये सेल फोनपेक्षा अधिक वैशिष्ट्ये आहेत. कॉलिंग आणि मेसेजिंग व्यतिरिक्त वापरकर्ते यामध्ये फोटो क्लिक करू शकतात. तसेच व्हिडिओ देखील तयार करू शकता. स्मार्टफोनसह युजर्सही याचा देखील भरपूर वापर करतात. स्मार्टफोनविषययी सांगायचे झाल्यास आज स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये सर्वाधिक वापरला जातो. त्यात बरीच खास वैशिष्ट्ये आणि नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कंपन्यां वापरकर्त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रत्येक बजेटमध्ये स्मार्टफोन देण्यात उपलब्ध करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com