esakal | सोनी इंडियाचे सुपरफास्ट युएसबी फ्लॅश ड्राईव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Sony India Launches New USB Flash Drive

या ड्राईव्हने मोठ्या मिडिया फाईल देखील पीसीमध्ये काही सेकंदातच ट्रांसफर करता येऊ शकतात. 

सोनी इंडियाचे सुपरफास्ट युएसबी फ्लॅश ड्राईव्ह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोनी इंडियाने नुकतीच USM-BA2, USM-CA2 आणि USM-MX3 हे आपले नवीन मेड इन इंडिया युएसबी फ्लॅश ड्राईव्ह लॉन्च केले आहे. हे ड्राईव्ह अतिशय वेगाने डेटा शेअरिंग आणि ट्रांसफरसाठी उपयुक्त आहे.

या ड्राईव्हचे वैशिष्टय असे की, हे तीनही स्टोअरेज डिव्हाइस मॉडेल्स मेटालिक, अॅण्टी-कॉरोसिव्ह आणि सुपरस्पीड 3.1 जेन 1 सोबत पूर्तता करणारी आहेत. या ड्राईव्हने मोठ्या मिडिया फाईल देखील पीसीमध्ये काही सेकंदातच ट्रांसफर करता येऊ शकतात. 

USM-MX3 सीरिज ही लहान आकाराची हाताळण्यास सोपी युएसबी फ्लॅश ड्राईव्ह आहे. यातील मॅट फिनिश असलेल्या पार्ट्‌समुळे बोटांमध्ये युएसबी फ्लॅश ड्राईव्ह व्यवस्थित घट्ट पकडता येतो. या नवीन सीरिजमध्ये ड्राईव्ह सहजपणे हाताळण्यासाठी स्ट्रॅप-होल आणि मॅट प्लास्टिक ग्रिपही आहे. USM-BA2 सीरिज आणि USM-CA2 सीरिज हे ऑन- दी- गो युएसबी फ्लॅश ड्राईव्ह आहेत. अनेक डिव्हाइसना ट्रांसफर करण्यासाठी USM-BA2 सीरिजमध्ये ड्‌युअल-पोर्ट ब्रिज आहे. त्यात मायक्रो युएसबी आणि युएसबी टाईप-ए पोर्ट्‌सही आहेत.  विंडोज पीसी, मॅकिंतोश, अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन आणि टॅबलेटसोबत हे ड्राईव्ह वापरण्यास योग्य आहे. तर  USM-CA2 सुद्धा ड्‌युअल-पोर्ट ब्रिजवर चालतं. विंडोज पीसी, मॅकिंतोश अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन आणि क्रोमबूक पिक्सेलसोबत हे ड्राईव्ह वापरण्यास योग्य आहे. त्यातही दोन्ही युएसबी ड्राईव्ह टाईप-सी आणि ए पोर्ट्‌स विभिन्न डिव्हाइसेससोबत वापरता येऊ शकतात. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

loading image