PlayStation VR2 : अखेर भारतात लाँच झालं प्लेस्टेशन व्हीआर-2; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Online Gaming : प्लेस्टेशन व्हीआर-2 हे भारतात तुम्ही सोनीच्या अधिकृत दुकांनांमधून तसंच वेबसाईटवरुन ऑर्डर करू शकता.
PlayStation VR2 India
PlayStation VR2 IndiaeSakal

PlayStation VR2 India Price : सोनी कंपनीने यावर्षी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपले PlayStation VR2 लाँच केले होते. आता या व्हीआरचे भारतात आगमन झाले आहे. यावर 20 गेम्सचा सपोर्ट मिळतो. हे तुम्हाला कधीपासून खरेदी करता येतील, आणि यांची किंमत किती असणार आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

प्लेस्टेशन व्हीआर-2 हे भारतात तुम्ही सोनीच्या अधिकृत दुकांनांमधून तसंच वेबसाईटवरुन ऑर्डर करू शकता. याची किंमत 57,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याचा सेन्स कंट्रोलर चार्जिंग स्टेशन वेगळा विकत घ्यावा लागणार आहे. चार्जिंग स्टेशनची किंमत भारतात किती असेल याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.

फीचर्स

प्लेस्टेशन व्हीआर-2 मध्ये सेन्स टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यामध्ये आय ट्रॅकिंग, 3D ऑडिओ, अ‍ॅडाप्टिव्ह ट्रिगर आणि हॅप्टिक फीडबॅक अशा गोष्टी देण्यात आल्या आहेत. यामुळे गेमिंगची मजा कितीतरी पटींनी वाढते.

यासोबतच या नवीन हेडसेटमध्ये 4000x2040 हाय डायनॅमिक रेंज व्हिडिओ फॉरमॅट देण्यात आला आहे. या रेंजमुळे गेमर्सना नेक्स्ट जेन अनुभव मिळतो, असं कंपनीने म्हटलं आहे. (Gaming News)

PlayStation VR2 India
Game Awards 2023 : यावर्षीच्या गेम अवॉर्ड्सची घोषणा, कोणती ठरली सर्वोत्कृष्ट गेम? पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

माऊटन बंडल

प्लेस्टेशन व्हीआर-2 च्या माउंटन बंडलची किंमत 61,999 रुपये आहे. यामध्ये एक पीएसव्हीआर हेडसेट, सेन्स कंट्रोलर, कंट्रोलर पेअरिंग, चार्जिंगसाठी यूएसबी केबल, स्टीरिओ हेडफोन, इअरपीसच्या तीन जोड्या आणि होरायजन कॉल ऑफ दि माऊंटन या गेमचा व्हाउचर कोड असा सगळा सेटअप मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com