
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सोमवारी ऐतिहासिक स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) मिशन यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. २४ विज्ञान प्रयोगांसह, हे मिशन भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (PSLV) द्वारे दोन 220 किलो वजनाचे उपग्रह श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणाची वेळ केवळ दोन मिनिटांनी पुढे ढकलण्यात आली होती, जेणेकरून कक्षेत फिरणाऱ्या अन्य उपग्रहांशी टक्कर टाळता येईल.