

Space belt to become new arena of war in next 5 years; Experts' warning
Sakal
येत्या पाच वर्षांत पृथ्वीभोवतालचा अवकाशाचा पट्टा युद्धाचा नवा अड्डा बनण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार महासत्तांमधील वाढत्या राजकीय आणि लष्करी स्पर्धेचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन डिजिटल व्यवहारांवर होऊ शकतो. आकाशात फिरणारे उपग्रह हे आता केवळ संशोधनाचे साधन राहिलेले नसून ते देशांच्या सुरक्षेचे प्रमुख केंद्र बनले आहेत.