
स्टारलिंक भारतात 3,000-4,200 रुपये मासिक शुल्कासह 25-220 Mbps वेगाची उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करणार आहे.
सुरुवातीला 20 लाख ग्राहकांसाठी ही सेवा ग्रामीण भागांतील कनेक्टिव्हिटी सुधारेल.
2026 पासून नवीन उपग्रहांमुळे इंटरनेटचा वेग 10 पटींनी वाढण्याची शक्यता आहे.
Starlink India Price : इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवेची भारतात लवकरच सुरुवात होणार आहे. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी याला हिरवा कंदील दाखवला असून, देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागांसाठी ही सेवा वरदान ठरणार आहे.
स्टारलिंकच्या माध्यमातून 25 ते 220 Mbps वेगाने इंटरनेट मिळणार असून, मासिक शुल्क सुमारे 3,000 ते 4,200 रुपये असेल. मात्र सुरुवातीला केवळ 20 लाख ग्राहकांपुरतीच ही सेवा मर्यादित असेल.पारंपरिक ब्रॉडबँड सेवा उपलब्ध नसलेल्या भागांना जोडण्यावर स्टारलिंकचा भर आहे. यासाठी आवश्यक असलेले डिश आणि राउटरसह हार्डवेअर किटची किंमत अंदाजे 33,000 रुपये असेल.
विशेष म्हणजे, एअरटेल आणि जिओसारख्या भारतीय दूरसंचार कंपन्यांशी भागीदारी करून ही सेवा वितरित केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या सुटण्यास मदत होईल.2025 च्या अखेरीस ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून, लवकरच प्री बुकिंगला सुरुवात होऊ शकते.
भविष्यात 2026 पासून स्टारलिंकच्या नव्या उपग्रहांमुळे इंटरनेटचा वेग तब्बल 10 पटींनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी स्टारलिंक शहरी भागातील जिओ, एअरटेल किंवा बीएसएनएलसारख्या कंपन्यांशी थेट स्पर्धा करणार नाही, परंतु ग्रामीण भारतासाठी ही सेवा डिजिटल क्रांतीचा पाया रचू शकते.
What is Starlink’s internet service?
स्टारलिंकची इंटरनेट सेवा काय आहे?
स्टारलिंक ही स्पेसएक्सची उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा आहे, जी कमी पृथ्वी कक्षेतील उपग्रहांद्वारे हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करते, विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागांसाठी.
How much will Starlink cost in India?
भारतात स्टारलिंकची किंमत किती असेल?
स्टारलिंकचे मासिक शुल्क सुमारे 3,000 ते 4,200 रुपये असेल, तर हार्डवेअर किटची किंमत अंदाजे 33,000 रुपये आहे.
What internet speeds will Starlink offer in India?
स्टारलिंक भारतात कोणता इंटरनेट वेग देईल?
भारतात स्टारलिंक 25 Mbps ते 220 Mbps पर्यंत इंटरनेट वेग देईल, भविष्यात यामध्ये वाढ होऊ शकते.
Who can access Starlink’s service in India?
भारतात स्टारलिंकची सेवा कोण वापरू शकते?
सुरुवातीला ही सेवा 20 लाख ग्राहकांपुरती मर्यादित असेल, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांतील वापरकर्त्यांसाठी.
When will Starlink launch in India?
स्टारलिंक भारतात कधी सुरू होईल?
स्टारलिंक 2025 च्या अखेरीस भारतात सुरू होण्याची शक्यता आहे, आणि लवकरच प्री-बुकिंग सुरू होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.