टाकावू वस्तूपासून बनविले वाफेवर चालणारे इंजिन 

अशोक तोरस्कर
रविवार, 2 जून 2019

उत्तूर - धामणे (ता. आजरा) येथील निवृती शिवराम पाटील (वय 50) यांनी टाकावू वस्तूपासून वाफेवर चालणारे स्टर्लिंग इंजिन तयार केले आहे. त्यांचा हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअर्सनाही हा प्रोजेक्‍ट मार्गदर्शक ठरणार आहे. 

उत्तूर - धामणे (ता. आजरा) येथील निवृती शिवराम पाटील (वय 50) यांनी टाकावू वस्तूपासून वाफेवर चालणारे स्टर्लिंग इंजिन तयार केले आहे. त्यांचा हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअर्सनाही हा प्रोजेक्‍ट मार्गदर्शक ठरणार आहे. 

पाटील यांचे उत्तूर येथे सह्याद्री इलेक्‍टॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीचे दुकान आहे. 2000 साली त्यांनी म्युझिक लाईटची माहिती घेतली. गणेश चतुर्थीमध्ये पुणे येथे मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. ही रोषणाई आवाजाच्या तालावर बदलली जाते याबाबत अधिक माहिती घेतली असता आवाज बदलण्यासाठी ऑपरेटरची गरज असते विनाऑपरेटर विद्युत रोषणाई बदलल्यास यातून नवीन पेटंट तयार होईल, असा विचार पाटील यांच्या मनात आला. त्यांनी असे उपकरण तयार केले. त्यांनी याचे पेटंटही मिळविले. यानंतर 2007 साली ऑटोमेटीक हेड लाईट डिमर सिस्टीम ही त्यांनी तयार केले. यामध्ये रात्रीच्या वेळी दोन चार चाकी गाड्या समोरासमोर येतात त्यावेळी हेड लाईट चालकाच्या डोळ्यावर पडतो व अपघात होण्याचा संभव असतो. यासाठी चालकाला हाताने प्रकाशझोत कमी अधिक करावा लागतो मात्र, पाटील यांनी अभ्यास करून हा प्रकाशझोत ऑटोमेटीक कमी होईल, अशी सिस्टीम तयार केली आणि यासाठीचेही पेटंट त्यांनी मिळविले. त्याचे दुकान म्हणजे एक प्रयोग शाळाच आहे.

आता त्यांनी वाफेवर चालणारे इंजिन तयार केले आहे. यासाठी रिकामे टीन, खराब सिडी व इतर टाकावू साहित्य वापरले. यासाठी दोन रुपयाचा फुगा फक्त विकत आणावा लागला. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी गर्दी करीत आहेत. कोणतेही प्रशिक्षण न घेता उपजत बुद्धीमता असलेल्या पाटील यांचे परिसरात कौतुक होत आहे. 
 
ऑटोमेटीक हेड लाईट डिमर सिस्टीमला पेटंट मिळाल्यावर अनेक परदेशी कंपन्यांनी आपल्यासी संपर्क साधला आहे. काही कंपनीत जाऊन सादरीकरण केले आहे. लवकरच हे पेटेंट देऊन त्याची चांगली किंमत आपल्याला मिळेल. 
- निवृती पाटील,
धामणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steam engine built from waste material