'डायनामाइट'सारखं घातक स्फोटक बनवणाऱ्या वैज्ञानिकाची गोष्ट

डायनामाइट बनवणाऱ्या 'Alfred Nobel'च्या नावाने सुरु झाले नोबेल पारितोषिक
Alfred Nobel
Alfred Nobelesakal
Summary

डायनामाइट बनवणाऱ्या 'Alfred Nobel'च्या नावाने सुरु झाले नोबेल पारितोषिक. आज अल्फ्रेड नोबेलचा स्मृतीदिन. त्यांना विनम्र अभिवादन!

आज आपल्या हयातीतच ‘दंतकथा’ झालेल्या एका संशोधकाची (Researcher) गोष्ट सांगतो. त्याचे वडील खरं तर अल्पशिक्षित पण उद्योगी मनुष्य. सैन्यासाठी गनपावडर आणि तत्सम उत्पादन करणं हा त्यांचा उद्योग. अश्याच एका नायट्रोग्लीसरिनच्या विस्फोटक उत्पादन (Explosive production) असलेल्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आपल्या कथानायकाच्या भावाचा मृत्यू (Death) झाला अन् तो कारखाना (Factory) कायमचा बंद पडला अन् सगळा कच्चा मालही (Raw material)पडून राहिला. काही दिवसांनी बघतो तर काय? नायट्रोग्लिसरिन (Nitroglycerin) कोरडं होऊन त्याची अगदी पावडर झाली होती अन् त्याच्यातून शोध लागला डायनामाईटचा (Dynamite).

Alfred Nobel
जगाला बास्किन रॉबिन्स देणारा आईस्क्रीम निर्माता 'आयर्विन रॉबिन्स' यांची कहाणी

बरं वडील अल्पशिक्षित होते हा थेट विज्ञानाचा विद्यार्थी. त्यात याची रशियन-फ्रेंच-जर्मन-इंग्लिश या भाषांवर पकड. याला पुस्तकांचाही भारी नाद. त्याची वैयक्तिक लायब्ररी (Library) प्रचंड मोठी होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो ही विस्फोटकांच्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट झाला. डायनामाईटसह (Dynamite) त्याने अनेक स्फोटकांचं पेटंट घेतलं होतं, शिवाय ‘बेलिस्टाइट’ (Ballistite) नावाचं एक विनाधुराचं विस्फोटकही विकसित केलं होतं. रबर-चामडे-कृत्रिम रेशीम यांसह याच्याकडे सुमारे ३३५ पेटंट होते. अर्थात हे सगळं केव्हाच संशोधनापलिकडे जाऊन प्रचंड मोठी अर्थव्यवस्था बनले होते. त्याने चिक्कार पैसा कमवला.

Alfred Nobel
टाटा मीठापासून ते टायटनपर्यंत इंडस्ट्रीज उभ्या करणाऱ्या जेआरडींची कहाणी

असं म्हणतात एकेदिवशी त्याने वर्तमानपत्रात चुकून छापलेल्या आपल्याच मृत्यूची बातमी (News of death) वाचली. बातमीचं शिर्षक होतं “Le marchand de la mort est mort" अर्थात ‘एका मृत्यूच्या व्यापाऱ्याचा अंत’तो प्रचंड विचलित झाला. हे मोल माझ्या संशोधनाचं? काय उपयोग एवढा पैसा कमवून? त्यानं लगेच मृत्यूपत्र (Death letter) तयार करत सगळी संपत्ती ट्रस्टच्या नावे बॅंकेत टाकली आणि त्याच्या व्याजावर मिळणाऱ्या पैशांतून सामाजिक-साहित्य-कला-विज्ञान या क्षेत्रात मानवी मुल्यांची जपणूक करत भरीव कार्य करणाऱ्यांना दरवर्षी भरघोस रकमेचा पुरस्कार जाहीर करता येईल अशी तजवीज केली. १८९५ ला पुरस्कारासाठी सुमारे ३१,२२५,००० स्विडिश क्रोनोर (Swedish kronor) इतकी रक्कम जमा केली. तुर्तास ती जवळपास १७०२ मिलियन स्विडिश क्रोनोर इतकी आहे. एका विजेत्याला ९ मिलियन स्विडिश क्रोनोर दिले जातात.

हा पुरस्कार म्हणजे जगातला सगळ्यात मानाचा ‘नोबेल’(Nobel) आणि आपल्या हयातीत जाता जाता सगळ्या जगाला ‘चांगलं’ काम करण्याची प्रेरणा देणारा तो यशस्वी संशोधक उद्योजक (Successful research entrepreneur) म्हणजे अल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com