Storytel : पुस्तके माफक दरात 'ऐकण्यासाठी' स्टोरीटेलची खास ऑफर

Storytel  Offer
Storytel Offer esakal
Updated on

स्टोरीटेल (Storytel)हे एक असे डिजीटल व्यासपीठ आहे जेथे पुसतके वाचली नाही तर ऐकली जातात. वाचायचा कंटाळा असलेल्या आपल्यासारख्या अनेक लोकं या स्टोरीटेलवर आपल्याला हवी असणारी अनेक पुस्तकांचा श्रवणीय आनंद घेऊ शकतात. आता हा पुस्तके ऐकण्याचा आनंद आपल्याला माफक दरात घेता येणार आहे. स्टोरीटेलने आपल्या वर्षिक सबस्क्रिप्शनमध्ये सवलत (Storytel Offer) देऊ केली आहे.

स्टोरीटेल सिलेक्ट (Storytel Select)हा वार्षिक प्लॅन घेऊन आले आहेत. हा वार्षिक प्लॅन फक्त 399 रुपयात मिळणार आङे. यापूर्वी या प्लॅनची किंमत 1198 रुपये इतकी होती. मात्र ही ऑफर फक्त 31 डिसेंबर 2021 पर्यंतच उपलब्ध असणार आहे. स्टोरीटेलच्या या 399 च्या ऑफरमध्ये तुम्ही 10 पेक्षा जास्त प्रादेशिक भाषांमधील ऑडिओ बुक्स वाचू शकता.

Storytel  Offer
Oppo च्या 'या' सहा कॅमेरावाल्या फोनवर 9000 रुपयांची धमाकेदार सूट

या नव्या अत्यंत माफक दरातील ऑफरबद्दल बोलताना स्टोरीटेलचे मॅनेजर योगेश दशरथ म्हणाले की, 'गाजलेल्या पुस्ताकांच्या ऑडिओ बुक्सला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. याबाबत लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आम्ही आता 11 प्रादेशिक भाषांमधील गोष्टींवर स्टोरीटेल वर्षभर अनलिमिटेड अॅक्सेस देण्यासाठी एक खास ऑफर (Storytel Offer) घेऊन आलो आहेत. ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी आणि पुस्तके शोधणे सोपे करणे हा यामागचा हेतू आहे. आमच्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आम्ही नेहमी नवीन गोष्टी आणण्यासाठी तयार असतो.'

स्टोरीटेलवर वार्षिक प्लॅन कसा सिलेक्ट करायचा?

सर्वात प्रथम https://www.storytel.com या वेबसाईटवर जायचे.

त्यानंतर चेंज युअर प्लॅन ( Change Your Plan ) यावर क्लिक करायचे.

पुढे दोन पर्याय येतील त्यातील 12 महिन्यांसाठीचा पर्याय निवडायचा.

त्यानंतर ई मेल आणि पासवर्डद्वारे आपले अकाऊंट तयार करुन घ्यायचे.

त्यानंतर आपले नाव आणि मोबाईल नंबर लिहायचा.

यानंतर पेमेंट करण्याचा एक पर्याय निवडायचा.

त्यानंतर स्टोरीटेल iOS अॅप https://apps.apple.com/in/app/storytel-audiobooks-e-books/id348177651आणि गुगल प्ले स्टोअरवरून https://play.google.com/store/apps/details?id=grit.storytel.app अॅप डाऊनलोड करुन घ्या. अॅप लॉग इन करण्यासाठी स्टोरीटेल वेबसाईवरील ई मेल आणि पासवर्ड वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com