Sun Halo : जगभरात ठिकठिकाणी दिसला 'हेलो इफेक्ट'; सूर्याभोवती कशामुळे तयार होतं हे रिंगण? जाणून घ्या

Halo Effect : गुरुवारी आणि शुक्रवारी जगभरात ठिकठिकाणी 'हेलो इफेक्ट' पाहायला मिळाला.
Sun Halo Effect
Sun Halo EffecteSakal
Updated on

जगामध्ये कित्येक अद्भुत घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वीच आपण 'सूपर ब्लू-मून'चा आनंद घेतला. त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी जगभरात ठिकठिकाणी 'हेलो इफेक्ट' पाहायला मिळाला. यामध्ये सूर्याच्या भोवती इंद्रधनुष्याप्रमाणे एक रिंगण तयार होतं.

केवळ भारतातच नाही, तर जगभरातील कित्येक देशांमध्ये काल आणि आज हा अद्भुत नजारा पहायला मिळाला. लोकांनी सूर्याभोवती असणाऱ्या या रिंगचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. या घटनेला 'सन हेलो' किंवा 'सोलार हेलो' असंही म्हटलं जातं.

कशामुळे तयार होतो 'सन हेलो'?

ही खरंतर एकदम साधारण घटना आहे. वातावरणात असणाऱ्या हेक्सागोनल क्रिस्टलमुळे असं होतं. वातावरणातील पाण्याच्या षटकोनी कणांवर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा त्यातून होणाऱ्या रिफ्रॅक्शनमुळे असा इफेक्ट दिसतो.

Sun Halo Effect
VIDEO : मनमोहक वातावरण अन् डोळ्याचं पारणं फेडणारा नजारा; उलट्या धबधब्याच्या हंगामाला सुरुवात

दुर्मिळ असतात घटना

'हेलो' म्हणजे प्रकाशाने किंवा एनर्जीने तयार झालेली एखादी गोलाकार आकृती. यामुळेच या घटनेला 'सन हेलो' म्हणतात. अशी घटना घडण्यासाठी सूर्याचा पृथ्वीशी एक विशिष्ट कोन (22 डिग्री) असणंही गरजेचं असतं. यासोबतच हवेत पुरेशी आद्रता असणंही आवश्यक असतं. यामुळेच या घटना अगदी दुर्मिळ असतात.

Sun Halo Effect
Aditya L1 Mission : सूर्याचा अभ्यास करणं सोपं काम नाही! 'आदित्य एल-1' समोर कोणती आव्हानं? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com