
NASAच्या भारतीय वंशाच्या प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर हे तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार आहेत. ते जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकले होते. त्यांच्या बोईंग स्टारलाइनर यानाला तांत्रिक अडचणी आल्याने त्यांना तिथेच थांबावे लागले. अखेर 2025च्या मार्च महिन्यात त्यांची पृथ्वीवर पुनरागमनाची योजना आखण्यात आली आहे.