

वॉशिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’च्या (नासा) अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील (आयएसएस) लांबलेला मुक्काम संपवून मंगळवारी (ता.१८) सकाळी साडेआठच्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार) पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू करणार आहेत.