Sunroof Car: उन्हाळ्यात कारच्या 'या' फीचरमुळे वाढेल डोकेदुखी

Sunroof Car: अनेक लोकांकडे सनरूफ फिचर असलेली कार असेल,पण उन्हाळ्यात हे फिचर डोकेदुखी वाढवू शकते.
Sunroof Car
Sunroof CarSakal

Sunroof Car Big Disadvantages: भारतात मोठ्या प्रमाणात कारची विक्री होत आहे. ग्राहकांना कारमधील काही फिचर खुप आवडतात. या यादीत सनरूफ हे फिचर देखील आहे, जे सर्व लोकांना खुप आवते. पण उन्हाळ्यात या फीचरमुळेअनेक समस्या निर्माण होताता. या समस्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

कारमधील सनरूफचे तोटे

उन्हाळ्यात कारमधील सनरूफसारख्या फिचरचा एक तोटा म्हणजे कारमध्ये प्रवास करताना जास्त गरम होते. कारण सामान्य कारचे टप पूर्णपणे झाकलेले असते आणि धातूचे बनलेले असते. याशिवाय, आतून एक विशेष थर लावलेला असतो. यामुळे कारचे टप सूर्यप्रकाशाने तापले तरी कारच्या आत जास्त उष्णता जाणवत नाही. पण सनरूफ असलेल्या गाड्यांमध्ये टपाचा मोठा भाग काचेने झाकलेला असतो. त्यामुळे गाडी आतून जास्त गरम होते.

एसीवर येतो लोड

सनरूफ असलेल्या कारमध्ये एसीवर जास्त लोड येऊ शकतो. कारण सुर्यप्रकाशामुळे कार आतून खूप गरम होते. अतिउष्णतेमुळे एसी वेगाने चालवावा लागतो. त्यामुळे एसीवर जास्त लोड येतो.

Sunroof Car
Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

अॅव्हरेजवर होतो परिणाम

सनरूफ असलेल्या गाड्यांमध्ये उन्हाळ्यात एसी खूप वेगाने चालवण्याचा कारच्या अॅव्हरेजवर नकारात्मक परिणाम होतो. कार थंड करण्यासाठी एसीला क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागते. यामुळे इंधनाचा वापरही वाढतो. त्यामुळे वाहनाच्या अॅव्हरेजवर वाईट परिणाम होतो.

कोणती काळजी घ्यावी

उन्हाळ्यात प्रवास करताना सनरूफ बंद ठेवावे.

कारच्या खिडक्यांना पडदे लावू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com