Supreme Court Fined Ford : सर्वोच्च न्यायालयाचा 'फोर्ड'ला दणका! खराब गाडी मिळालेल्या ग्राहकाला ४२ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

Fine Imposed on Ford : दंडाची रक्कम मिळाल्यानंतर मालकाने गाडी कंपनीला परत द्यावी, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
SC on Ford India
SC on Ford IndiaeSakal

सर्वोच्च न्यायालयाने फोर्ड इंडिया लिमिटेडला मोठा दणका दिला आहे. डिफेक्टिव्ह गाडी मिळाल्याची तक्रार केलेल्या एका ग्राहकाला ४२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या व्यक्तीने घेतलेल्या गाडीमध्ये बिघाड असल्यामुळे त्याने तक्रार दाखल केली होती.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी दंडाची रक्कम मिळाल्यानंतर मालकाने गाडी कंपनीला परत द्यावी, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

SC on Ford India
Railway Fare : प्रवाशांसाठी खुशखबर! वंदे भारतसह कित्येक रेल्वेंच्या तिकिटात मोठी कपात; रेल्वेची घोषणा

या व्यक्तीने फोर्ड कंपनीची टायटेनियम एंडेव्हर ३.४L ही गाडी खरेदी केली होती. विकत घेतल्यानंतर लगेच गाडीमध्ये तेल गळतीसह इतर अनेक दोष दिसून आले होते. त्यामुळे मालकाने राज्य आयोगासमोर ग्राहक तक्रार दाखल केली होती.

राज्य आयोगाने याप्रकरणी कंपनीला मोफत इंजिन बदलून देण्याचे निर्देश दिले होते. तसेच, याला जेवढा वेळ लागेल, त्या काळात प्रतिदिन दोन हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही राज्य आयोगाने दिले होते. राष्ट्रीय आयोगाने देखील हा आदेश कायम ठेवला होता. यानंतर फोर्ड इंडियाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

SC on Ford India
Threads by Instagram : थ्रेड्स अ‍ॅप नव्हे ट्रॅप? यूजर्सना करता येईना डिलीट; लवकरच येणार अपडेट

सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरू असताना मधल्या काळात कंपनीने कारचं इंजिन बदलून दिलं होतं. मात्र, यानंतरही कारमध्ये कित्येक त्रुटी तशाच होत्या. त्यामुळे आपण ही गाडी चालवू शकत नसल्याचं मालकाने न्यायालायत सांगितलं.

या सर्व बाबी लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला आदेश दिले, की त्यांनी कार मालकाला ४२ लाख रुपयांची भरपाई द्यावी. यातील ६ लाख रुपये कंपनीने यापूर्वीच ग्राहकाला दिले आहेत. त्यामुळे उरलेले ३६ लाख रुपये आता कंपनी या ग्राहकाला देणार आहे. या व्यतिरिक्त वाहन विम्यासाठी ८७ हजार रुपये देखील कंपनीनेच गाडीच्या मालकाला द्यायचे आहेत, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

SC on Ford India
Invicto : मारूती-सुझुकीने लाँच केली नवी प्रीमियम MVP कार! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com