Surya Grahan Photography : मोबाईलवरून असे क्लिक करा सूर्यग्रहणाचे भन्नाट फोटो

सूर्यग्रहणाची फोटोग्राफी सुरू करण्यापूर्वी स्वतःचे सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे.
Surya Grahan Photography
Surya Grahan Photography Sakal

Surya Grahan 2022 Photography Tips : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज म्हणजेच 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. आज अनेकजण हौस म्हणून फोटोग्राफी करतात. मात्र, अनेकदा चांगला कॅमेरा नसल्याने हिरमोड होतो. आज आम्ही तुम्हाला स्‍मार्टफोनच्‍या कॅमेरातून कशा पद्धतीने सूर्यग्रहणाचे भन्नाट फोटो क्लिक करू शकता याबाबत काही टिप्स सांगणार आहोत.

Surya Grahan Photography
Surya Grahan 2022 : भारतात दिसणारं आंशिक सूर्यग्रहण नेमकं काय? कुठे दिसणार

पहिले स्वतःची सुरक्षा

सूर्यग्रहणाची फोटोग्राफी सुरू करण्यापूर्वी स्वतःचे सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. कारण ग्रहणावेळची सूर्याची किरणे तुमच्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे सर्वप्रथम फोटोग्राफी करताना सर्वात प्रथम शरीर पूर्णपणे झाकून घ्या आणि सनग्लासेसचा वापर करा. याशिवाय डोक्यावर टोपीही घाला.

एक्स-रे किंवा यूव्ही फिल्टरचा वापर

सूर्यग्रहणाच्या वेळी येणारी थेट किरणं तुमच्या कॅमेरा सेन्सर्सला हानी पोहोचवू शकतात. ही हानी टाळण्यासाठी कॅमेरा लेन्ससमोर एक्स-रे किंवा यूव्ही फिल्टरचा वापर करा. यामुळे तुमच्या फोनचा कॅमेरा सेन्सर सुरक्षित राहील आणि कोणतीही हानी होणार नाही.

Surya Grahan Photography
Surya Grahan 2022 : सकाळपासून सुरू झालंय सुतक; चुकूनही करू नका 'ही' कामं

लोकेशनची निवड

सूर्यग्रहणादरम्यान चांगले फोटो काढण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. चांगल्या फोटोग्रासाठी एखादी चांगली मोकळी जागा शोधा. मोकळ्या जागेतून सूर्यग्रहणाचे चांगले फोटो काढण्यास मदत होईल. फोटोग्राफीसाठी जागा शोधताना कॅमेराच्यामध्ये तार, खांब, इमारत येणार नाही याची काळजी घ्या.

ट्रायपॉड आणि हाय रिझोल्यूशन कॅप्चर मोड

सूर्यग्रहणाची फोटोग्राफी करण्यासाठी तुम्ही ट्रायपॉडचा वापर करू शकता. ट्रायपॉडच्या मदतीने तुम्ही स्थिर आणि ब्लर फ्री शॉट्स घेऊ शकता. शिवाय याच्या मदतीने तुम्ही घरामध्ये बसूनही रिमोटद्वारे फोटो क्लिक करू शकता. जर तुमचा फोन 48MP, 64MP, 108MP सारख्या मोठ्या सेन्सर्ससह येत असेल तर या ऑप्शनचा वापर फोटो कॅप्चरसाठी अवश्य करा. फोटो काढताना झूम करण्याऐवजी हाय-रिझोल्यूशन फोटो क्रॉप करणे फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही झूमऐवजी टेलीफोटो सेन्सरचाही वापर करू शकता.

Surya Grahan Photography
Anand Mahindra : सोशल मीडियावर गाजतेय आनंद महिंद्रांची फोटोग्राफी

HDR मोडचा वापर

वरील टीप्सशिवाय तुम्ही HDR मोडचादेखील फोटोग्राफीसाठी वापर करू शकता. याच्या मदतीने फोटोची क्वालिटी सुधारण्यास मदत होते. कॅमेरा शेक टाळण्यासाठी तुम्ही टायमर किंवा रिमोट शटरचाही वापर करू शकता. टायमरच्या मदतीने तुम्ही शेक फ्री शॉट्स घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com