सुझुकीचे नवे स्कूटर Avenis लॉंच; मिळेल SMS, व्हॉट्सॲप अलर्ट फीचर | Suzuki Avenis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suzuki Avenis

सुझुकीचे नवे स्कूटर Avenis लॉंच; मिळेल SMS, व्हॉट्सॲप अलर्ट फीचर

सुझुकी मोटरसायकलने भारतात आपली नवीन स्कूटर Suzuki Avenis लाँच केली आहे. या स्पोर्टी 125cc स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 86,700 रुपये असून या भारतीय बाजारपेठेत सुझुकी एवेनिसची स्पर्धा थेट ही TVS Ntorq 125, Honda Grazia, Hero Maestro Edge 125 आणि Aprillia SR 125 या स्कूटरशी होणार आहे.

फीचर्स काय असतील?

125cc Suzuki Avenis Scooter मध्ये तुम्हाला कॉलर आयडी, SMS अलर्ट, WhatsApp अलर्ट, स्पीड एक्सिडेंट वॉर्निंग, फोनची बॅटरी लेव्हल डिस्प्ले सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर iOS आणि Android प्लॅटफॉर्मशी कनेक्टेड आहे. तसेच स्कूटरचे 125cc फ्युएल-इंजेक्टेड इंजिन 8.6 bhp पॉवर आणि 10Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

वेगवेगळ्या व्हेरियंटती किंमत

सुझुकी एवेनिस स्कूटरच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 86,700 रुपये आहे. तसेच सुझुकीच्या या स्कूटरच्या Race Edition ची एक्स-शोरूम किंमत 87,000 रुपये आहे. सुझुकी एवेनिस स्कूटरमध्ये बॉडी माउंटेड एलईडी, मोठी स्टोरेज स्पेस, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी टेल लॅम्प, स्पोर्टी मफलर कव्हर, अलॉय व्हील्स, आकर्षक ग्राफिक्स, साइड स्टँड लॉक, इंजिन किल स्विच, ड्युअल लगेज हुक आणि फ्रंट रॅक स्टोरेज हे फीचर्स दिले आहेत.

हेही वाचा: 'गुगल पे' वापरणे होणार आणखी सोपे; नुसते बोलून होतील पैसे ट्रांसफर

सुझुकी मोटरसायकल इंडिया डिसेंबर पासून Suzuki Avenis स्कूटरची रिटेलिंग विक्री सुरू करेल. ही स्कूटर मेटॅलिक ट्रायटन ब्लू कलरसह 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. सुझुकी एवेनिसचा रेस एडिशन व्हेरियंट सुझुकी रेसिंग ग्राफिक्ससह देण्यात येत आहे. या स्कूटरची इंधन टाकी क्षमता 5.2 लीटर असून सस्पेन्शन ड्यूटीबद्दल बोलायचे झाले तर स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागच्या बाजूला स्विंग आर्म सस्पेन्शन मिळेल.

हेही वाचा: शेतकऱ्याने समस्येत शोधली संधी; एका हंगामात कमावले 50 लाख

loading image
go to top