कोणत्या देशाला कचरा आयात करण्याची वेळ आली?

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

कच-याचा पुनर्वापर करून त्यापासून उर्जानिर्मिती केली जाते

लंडन : प्रत्येक देश आपल्या आजूबाजूला स्वच्छता राहावी यासाठी प्रयत्नशील असतो;मात्र स्वीडनसारखा देश मात्र इतर देशांतून कचरा आयात करत आहे. हे वाचून तुम्हालाही आश्‍चर्य वाट असेल ना?

कच-याचा पुनर्वापर करून त्यापासून उर्जानिर्मिती केली जाते

लंडन : प्रत्येक देश आपल्या आजूबाजूला स्वच्छता राहावी यासाठी प्रयत्नशील असतो;मात्र स्वीडनसारखा देश मात्र इतर देशांतून कचरा आयात करत आहे. हे वाचून तुम्हालाही आश्‍चर्य वाट असेल ना?

स्वीडनला मोठ्या प्रमाणत कच-याचा तुटवडा जाणवत आहे. स्वीडनमध्ये कच-याचा पुनर्वापर करून उर्जानिर्मिती केली जाते. ही उर्जा थंडीच्या दिवसांत घरे उबदार ठेवण्यासाठी वापरली जाते. हा देश गरजेपेक्षा जास्त विजेची निर्मिती ही टाकाऊ पदार्थांपासून करतो. या देशात 1991पासून जिवाश्‍म इंधनावर मोठ्या प्रमाणात कर लावायला सुरुवात केली. जिवाश्‍म इंधनावर मोठ्या प्रमाणात कर लावणा-या जगातील काही मोजक्‍या देशांपैकी स्वीडन एक आहे.

कच-याच्या पुनर्वापरावर या देशाने इतक्‍या मोठा भर दिला आहे की या देशात जितका कचरा तयार होतो त्यापैकी फक्त एक टक्का कचराच जमीनीत पुरवला जातो. इतर सर्व कच-याचा पुनर्वापर केला जातो. कचरा आयात करण्याचे प्रमुख कारण म्हणजे उर्जानिर्मिती. हा प्रकल्पांना अत्याधुनिक जोड देण्याचा विचारही स्थानिक सरकार करत आहे. भविष्यात कचरा वाहून नेण्यासाठी भूमितग कंटेनर प्रणाली आखत आहेत. जगातील बहुतेक देशांत कच-याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न जतील होत असताना स्वीडन सारख्या देशाने चांगला आदर्श समोर ठेवला आहे.

""स्वीडनमधील नागरिक आपल्या पर्यावर्णाविषयी अत्यंत जागरुक असून त्यांना यासाठी नेमके काय केले पाहिजे याची त्यांना चांगली समज आहे,''असे स्विडीश वेस्ट मॅनेजमेंट असोसिएशनच्या संचालक ऍना कॅरीन ग्रिपवॉल यांनी एका मुलाखतीत सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweden Runs Out Of Garbage, Imports From Other Countries