दिवाळीपूर्वी स्विगीचा धमाका, लॉन्च केलं भन्नाट फीचर! आता एकाच ऑर्डरमध्ये मागवता येणार ५ रेस्टॉरंटमधून जेवण

Swiggy New Feature : कंपनीने 'मल्टी रेस्टॉरंट ऑर्डरिंग' हे नवीन फीचर सुरू केलं असून, यामुळे एकाच व्यवहारात पाच वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून पदार्थ मागवता येणार आहेत.
Swiggy New Feature

Swiggy New Feature

esakal

Updated on: 

घरी जेवण मागवायचं म्हटलं की प्रत्येकाची आवड वेगळी असते. कोणाला बिर्याणी हवी असते, तर कोणाला पिझ्झा खायचा असतो. काही जणांना चायनीज किंवा सुशी खाण्याची इच्छा असते. अशावेळी सगळ्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर द्यावी लागते. प्रत्येक वेळी स्वतंत्र पेमेंट आणि डिलिव्हरी ट्रॅकिंगचा त्रासही होतो. मात्र, आता स्विगीने यावर एक सोपा पर्याय आणला आहे. कंपनीने 'मल्टी रेस्टॉरंट ऑर्डरिंग' हे नवीन फीचर सुरू केलं असून, यामुळे एकाच व्यवहारात पाच वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून पदार्थ मागवता येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com