Tahseen Poonawalla on ISRO : 'इस्रोच्या वैज्ञानिकांना तीन महिन्यांपासून पगार नाही'; तहसीन पूनावालाचा दावा! काय आहे सत्य?

PIB Fact Check : भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी याप्रकरणी आपल्याच भावाला घरचा आहेर दिला आहे.
Tahseen Poonawalla on ISRO
Tahseen Poonawalla on ISROeSakal

ISRO Scientists Salaries : भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-3 ही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मोहिमेसाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून अथक परिश्रम केले आहेत. मात्र, या वैज्ञानिकांना तीन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याचा दावा राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी केला होता.

पीआयबीने या दाव्याची तपासणी केली असता; हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा पगार मिळतो. तसेच हा पगार नियमितपणे मिळत असल्याचं पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या एक्स पोस्टमध्ये (ट्विटर) म्हटलं आहे.

Tahseen Poonawalla on ISRO
ISRO Aditya L1 : चंद्र टप्प्यात, अन् सूर्याकडे झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज! श्रीहरीकोटामध्ये पोहोचला 'आदित्य एल-1' उपग्रह

काय आहे प्रकरण?

15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'रणवीर पॉडकास्ट शो' या कार्यक्रमात पूनावाला उपस्थित होते. "इस्रोच्या वैज्ञानिकांना तीन महिन्यांपासून पगार मिळाला नाही. हे खरंय का? आताच्या सरकारचं हेच मला पटत नाही. आपल्याला इस्रोचा भरपूर अभिमान आहे. ही एक उत्तम संस्था आहे. मात्र, तीन महिन्यांपासून इथल्या वैज्ञानिकांना पगार देण्यात आलेला नाही. तुम्ही याबाबत माझं फॅक्ट-चेकही करू शकता." असं पूनावाला म्हणाले होते.

भावाने दिला घरचा आहेर

पीआयबीने तहसीन यांचा दावा खोटा असल्याचं म्हटल्यानंतर त्यांचे भाऊ आणि भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. "माझ्यासाठी नेहमीच माझ्या कुटुंबापेक्षा देशाला अधिक प्राधान्य राहील. माझ्या कुटुंबातील लोक जरी इस्रो किंवा भारताबद्दल फेक न्यूज पसरवत असतील, तर मी त्यांच्यावर टीका करेल. या दाव्याची सत्यता पडताळल्याबद्दल धन्यवाद पीआयबी" अशा आशयाचं ट्विट शहजाद यांनी केलं आहे.

सारवासारव करण्याचा प्रयत्न

दरम्यान, या सगळ्यात तहसीन पूनावाला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या विधानाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. माझं विधान हे माध्यमांमध्ये आलेल्या काही रिपोर्ट्सबद्दल होतं. माझा मुद्दा इथे इस्रो नव्हता, तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामाचा मोबदला न मिळणे हा होता. असं तहसीन यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Tahseen Poonawalla on ISRO
Chandrayaan 3 : चंद्राच्या जवळ पोहोचलं; मात्र अजूनही 'चांद्रयान-3'च्या मार्गात भरपूर अडथळे! कसं होणार लँडिंग?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com