Electric Scooter : तमिळनाडूत आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आगीत खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tamil nadu one more electric scooter goes up in  flames

Electric Scooter : तमिळनाडूत आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आगीत खाक

देशात जागोजागी इलेक्ट्रिक वाहनाना आग लागण्याचे अपघातात समोर येत आहेत, यादरम्यान शनिवारी पश्चिम तामिळनाडूमधील होसूरमध्ये एका इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली. या घटनेत आजूबाजूच्या लोकांनी वेळीच आग आटोक्यात आणण्यास मदत केल्याने वाहनाचा मालक सतीश बचावला.

काही दिवसांपूर्वी उत्तर तामिळनाडूमधील एका बाप-लेकीचा अशाच एका घटनेत श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती, या घटनेत घराबाहेर रात्रभर चार्ज होत असलेली इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली आणि धूर सगळ्या परीसरात भरला होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होसूरला लागून असलेल्या बेंगळुरूमधील एका खासगी कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या सतीशने गेल्या वर्षी ही स्कूटर खरेदी केली होती. "i-Praise+ नावाची इलेक्ट्रिक स्कूटर -- 2015 पासून भारतातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Okinawa द्वारे उत्पादित केली जाते," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: 'द्वेशाचं राजकारण' प्रकरणी माजी न्यायमूर्तींकडून PM मोंदीची पाठराखण

दरम्यान शनिवारी सतीश त्याच्या स्कूटरवरून जात असताना अचानक त्याला सीटच्या खालून आग आणि धूर निघताना दिसला आणि त्याने लगेच स्कूटरवरून उडी मारली. काही सेकंदातच आगीच्या ज्वाळांनी वाहन वेढले आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी ती आग आटोक्यात आणण्यास मदत केली. मात्र, वाहन जळून खाक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: योगी सरकारच्या मोहिमेला मोठं यश! अवघ्या 6 दिवसात काढले 46000 भोंगे

Web Title: Tamil Nadu One More Electric Scooter Goes Up In Flames

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Electric Scooter
go to top