
Tata च्या 'या' स्टायलिश कारची किंमत झाली कमी, जाणून घ्या किती?
नवी दिल्ली : टाटा मोटर्सने (Tata Motors) नुकतेच आपल्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. किंमतीत ही वाढ २० हजारांपर्यंत झाली आहे. मात्र अशा काही कारचे व्हेरिएंट आहेत, ज्यांची किंमत ही कमी झाली आहे. यापैकी एक Tata Altorz ही आहे. कंपनीने Tata Altroz i-Turbo व्हेरिएंटच्या वेगवेगळ्या ट्रिमची किंमत तीन हजारांपासून आठ हजारांपर्यंत कमी आहे. यात एक्सझेड आणि एक्सझेडप्लस डार्कची किंमत तीन हजारांनी कमी असेल. आता ती क्रमश: ८.७१ लाख रुपये आणि ९.३९ लाख रुपयांपासून सुरु होते. मात्र कंपनीने एक्सझेड प्लसची किंमत ८ हजार रुपयांपर्यंत कमी केली आहे. Tata Altroz i-Turbo XZ+ ची किंमत आता ९.०९ लाख रुपये होईल. तिची किंमत अगोदर ९.१७ लाख रुपये होती. (Tata Altroz Price Hike And Turbo Petrol Prices Come Down)
हेही वाचा: Tata च्या दोन नवीन CNG कार लॉंच; जाणून घ्या किमती-फीचर्ससह सर्वकाही
डिझेल व्हेरिएंटची किंमत ?
कंपनीने टाटा(Tata) अल्ट्रोझच्या डिझेल व्हेरिएंटची किंमतीत ५ हजारांपासून २० हजारांपर्यंत वाढ केली आहे. यात सर्वात कमी किंमत XE+ आणि XZ+ ची किंमत ५ हजार आणि सर्वात अधिक XM+ट्रिमची २० हजारांनी वाढली आहे. या व्यतिरिक्त टाटा अल्ट्रोझ डिझेल प्राईस हाईक एक्सई, एक्सटीची १५ हजार रुपये आणि एक्सझेड, एक्सझेड (ओ) ची १० हजारांपर्यंत किंमत वाढली आहे. या व्यतिरिक्त अल्ट्रोझची पेट्रोल व्हेरिएंटचे ही वेगवेगळ्या ट्रिम्सची किंमतही दोन हजारांपासून १५ रुपयांपर्यंत वाढली आहे.
हेही वाचा: Mob-Ion कंपनी आणणार इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर धावणार १४० किमी
दमदार आहे टाटा अल्ट्रोझ
टाटा अल्ट्रोझला कंपनी ३ इंजिन व्हेरिएंटमध्ये विकत आहे. त्यात १.२ लीटरचे पेट्रोल इंजिन ८६ एचपीची मॅक्स पाॅवर, ११३ एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते. दुसरीकडे १.२ लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन ११० एचपीचे मॅक्स पाॅवर, १४० एनएमचे पीक टाॅर्क आणि १.५ लीटरचे डिझेल इंजिन ९० एचपीची मॅक्स पाॅवर, २०० एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते. तिच्या सर्वात बेस माॅडलची किंमत आता ५.९९ लाख रुपयांपासून सुरु होते.
Web Title: Tata Altroz Price Hike And Turbo Petrol Prices Come Down
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..