

Tata Safari and Harrier facelift launch date
esakal
Tata New Car Launch : टाटा मोटर्सने आपल्या चाहत्यांना मोठी भेट दिली आहे..लोकप्रिय एसयूव्ही हॅरियर आणि सफारीचे फेसलिफ्ट मॉडेल्स आता पेट्रोल इंजिनसह येत आहेत. हे शक्तिशाली वाहन 9 डिसेंबरला भारतीय मार्केटमध्ये लाँच होणार आहेत. टाटा बऱ्याच काळापासून या अपडेटेड व्हर्जनवर मेहनत घेत आहे. आता खरेदीदारांना डिझेलच्या जोडाने पेट्रोलचा पर्याय मिळेल, ज्यामुळे स्पर्धेत या कारांना मजबूत स्थान मिळेल.