टाटाच्या Tiago आणि Tigor या CNG कार जानेवारीमध्ये लॉन्च होणार? | Upcoming CNG Cars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Tiago
टाटाच्या Tiago आणि Tigor या CNG कार जानेवारीमध्ये लॉन्च होणार? | Upcoming CNG Cars

टाटा Tiago आणि Tigor CNG कार जानेवारीमध्ये लाँच होणार?

प्रसिद्ध कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) यावर्षी 2 नवीन CNG कार आणण्यासाठी सज्ज आहे, ज्यांची ग्राहक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. Tata Motors जानेवारी 2022 मध्ये आपल्या आगामी CNG कार Tata Tiago आणि Tigor लाँच करू शकते. कंपनीने टाटा मोटर्सच्या निवडक डीलरशिपमध्ये बुकिंगसुद्धा सुरु केल्याचं कळतंय. जाणून घेऊया या कारची वैशिष्ट्ये...

Tata Motors ची CNG चलित Tiago आणि Tigor मॉडेल्स चाचणी दरम्यान अनेक वेळा स्पॉट झाल्या आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या फोटोनुसार, चाचणी मॉडेल पूर्णपणे कव्हर केलेले नव्हते आणि त्यावर 'ऑन टेस्ट बाय ARAI' चे स्टिकरही होते. मात्र, या कारबाबत अधिक माहिती लॉन्च झाल्यानंतरच समोर येईल.

हेही वाचा: GNCAP मध्ये सर्वाधिक सुरक्षित ठरलेल्या टॉप 5 भारतीय कार

कुणाशी असेल स्पर्धा? (Competitors)-

Tata Tiago CNG मॉडेलची भारतीय बाजारपेठेतील मारुती सुझुकी वॅगनआर WagonR CNG, ह्युंडाई सॅन्ट्रो (Hyundai Santro CNG) सारख्या कारशी थेट स्पर्धा होईल. तर, टाटा टिगोर (Tata Tigor CNG) सीएनजी कार मारुती सुझुकीच्या आगामी सेडान डिझायर (Dzire) सीएनजी आणि ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura) सीएनजी कारशी स्पर्धा करेल.

लूक आणि डिझाइन (Look and Design)-

स्टॉक इमेज नुसार, या CNG प्रकाराची रचना त्यांच्या स्टँडर्ड ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) मॉडेल्सच्या फेसलिफ्टेड आवृत्तीसारखी असेल. म्हणजेच, डिझाइन किंवा आकाराच्या बाबतीत, सीएनजी मॉडेलमध्ये कोणताही मोठा बदल दिसण्याची शक्यता कमी आहे. बाह्य स्वरूप आणि डिझाइनबद्दल बोलायचं झाल्यास, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, फॉग लॅम्प, शार्क फिन अँटेना, एलईडी स्टॉप लॅम्प, एलईडी टेललाइट्स यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: Top 10 Hatchback Cars : नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या 10 हॅचबॅक कार

वैशिष्ट्ये (Features)-

वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Tiago CNG XZ ला अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, व्हॉइस कमांड, स्टीयरिंग माउंट केलेले ऑडिओ आणि फोन कंट्रोल्स, हाईट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वन-टच ड्रॉ ड्रायव्हर विंडो, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम इत्यादींचा समावेश केला जाऊ शकतो.

इंजिन (Engine)-

या नवीन कारमध्ये 1.2-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन वापरण्यात येईल. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे. हे इंजिन सध्या 85 bhp ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. सीएनजी मॉडेलमध्ये हे इंजिन कमी उर्जा निर्माण करू शकते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top