Tata Motors : टाटा मोटर्सचा ग्राहकांना मोठा झटका, वाढवलेत 'या' कार्सचे दर l tata motors raised rates of tata safari and tata harrier know new price | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Motors

Tata Motors : टाटा मोटर्सचा ग्राहकांना मोठा झटका, वाढवलेत 'या' कार्सचे दर

Tata Motors : टाटा मोटर्सने नुकतेच आपल्या सफारी आणि हॅरियरचे रेड डार्क एडिशन लाँच केले आहे. यानंतर कंपनीने या दोन्ही कारच्या काही व्हेरिएंट्सला डिस्कंटीन्यू केले आहे. आणि आता यानंतर टाटा मोटर्सने या दोन्ही कारच्या किमती देखील वाढवल्या आहेत. यावर्षी कंपनीने दुसऱ्यांदा या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी कंपनीने त्यांच्या किमती 25,000 रुपयांनी वाढवल्या होत्या. टाटाने नेमक्या कोणत्या कार्सच्या किमती वाढवल्यात जाणून घेऊया.

टाटाने का वाढवल्या किंमती?

टाटा मोटर्सने यावेळी या गाड्यांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. यावेळी कंपनीने हॅरियरच्या किमतीत 47,000 हजार रुपयांनी आणि सफारीच्या किमतीत 66,000 रुपयांनी वाढ केली आहे. या कारच्या किमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या कारच्या काही व्हेरियंटमध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ADAS आणि मोठी टचस्क्रीन जोडण्यात आली आहे. किमतीत वाढ फक्त या दोन गाड्यांवर करण्यात आली आहे, इतर सर्व मॉडेल्सच्या किमती पूर्वीप्रमाणेच आहेत.

कंपनीने या दोन कारचे 26 व्हेरियंट बंद केले आहेत

आतापर्यंत Tata Harrier SUV चे 30 प्रकार बाजारात उपलब्ध होते, तर 36 प्रकार Tata Safari बाजारात उपलब्ध होते. म्हणजेच या दोन्ही कारचे एकूण 66 व्हेरियंट होते. पण आता कंपनीने या दोन्ही कारचे 26 व्हेरियंट बंद केले आहेत. (Tata Motors)

कंपनीने आपल्या हॅरियर लाइनअपमध्ये रेड डार्क एडिशनच्या 2 नवीन प्रकारांना स्थान दिले आहे, त्यानंतर आता ही कार एकूण 20 प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. (Automobile) त्याच वेळी, टाटा सफारीचे 4 नवीन रेड डार्क प्रकार या लाइनअपमध्ये जोडले गेले आहेत, ज्यानंतर त्याच्या प्रकारांची एकूण संख्या 26 झाली आहे.