
TATA Nexon EV : ४ दिवसांत ४००० किमी?, ‘टाटा’च्या नेक्सॉन ईव्हीनं चॅलेंज स्वीकारलं
TATA Nexon EV : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटामोबाइल उत्पादक आणि भारतातील ईव्ही क्रांतीमधील अग्रणी कंपनी आहे. आज कंपनीने घोषणा केली की, त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही नेक्सॉन ईव्ही श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंतच्या आव्हानात्मक प्रवासावर जाणार आहे.
२५ फेब्रुवारीपासून नेक्सॉन ईव्ही ईव्हीकडून सर्वात गतीशील के२के ड्राइव्हचा विक्रम स्थापित करणार आहे. नॉन-स्टॉप ड्राइव्हमध्ये (फक्त वेईकल चार्जिंग करण्यासाठी थांबण्यात येईल) ४ दिवसांत ४००० किमी अंतर प्रवास करणार आहे.
टाटा मोटर्सने त्रासमुक्त अनुभवासाठी नेक्सॉन ईव्हीची रेंज ४५३ किमीपर्यंत वाढवली आहे. तर टाटा पॉवरने पद्धतशीरपणे देशभरात महामार्गावरील चार्जिंग पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक चार्जिंग ओम्नीप्रेझेंट व सुलभपणे उपलब्ध होण्याजोगे झाले आहे.
या प्रवासादरम्यान नेक्सॉन ईव्ही भारतीय उपखंडामधील सर्वात प्रतिकूल वातावरणाचा सामना करेल आणि खडतर प्रदेशांमधून प्रवास करेल.
या उपक्रमाचा नेक्सॉन ईव्हीची उच्च गतीवर नियंत्रण ठेवण्याची, लांब अंतर कापण्याची क्षमता दाखवण्याचा, तसेच देशाच्या कानाकोप-यामध्ये सार्वजनिक चार्जिंग नेटवर्क उपलब्ध असल्याचे दाखवून देण्याचा मनसुबा आहे.
या उत्साहवर्धक प्रवासाबाबत सांगताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्या विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, ‘‘नवीन विकसित तंत्रज्ञान असल्यामुळे वास्तविक विश्वाला ईव्हीच्या रिअल टाइम स्थितींमधील क्षमता व वैशिष्ट्ये दाखवणे महत्त्वाचे आहे.
नेक्सॉन ईव्हीसह या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरूवात करत आमचा विद्यमान व भावी ईव्ही मालकांना नेक्सॉन ईव्हीच्या लांबच्या अंतरापर्यंतच्या लाभांचा सर्वसमावेशक पुरावा देत, सोबत टाटा पॉवर येथील आमच्या इकोस्टिम सहयोगींनी स्थापित केलेल्या वाढत्या चार्जिंग स्टेशन्सची खात्री देत प्रेरित करण्याचा मनसुबा आहे.
नेक्सॉन ईव्ही ४५३ किमीची सुधारित रेंज देते, भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या ४००० किमी प्रवासाचा आनंद घेणार आहोत.
प्रतिदिन १००० किमी अंतर पार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि मला खात्री आहे की, नेक्सॉन ईव्ही हे ध्येय लीलया पार करेल. मला विश्वास आहे की, हे के२के ड्राइव्ह भारतात ईव्ही अवलंबतेला चालना देईल, ग्राहकांना मुख्य निवड देईल.’’
अंतर्गत क्षमता आणि ‘गो एनीव्हेअर’ वृत्तीसह नेक्सॉन ईव्ही या उल्लेखनीय प्रवासासाठी परिपूर्ण सोबती आहे. ही वेईकल इलेक्ट्रिफाइंग कामगिरीसह सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देते.
ही वेईकल अधिक रेंज व पॉवर देण्यासोबत जलद चार्जिंग, सुलभपणे विना-व्यत्यय लांबचे अंतर पार करण्याची खात्री देखील देते.
हाय व्होल्टेज अत्याधुनिक झिप्ट्रॉन तंत्रज्ञानाची शक्ती असलेली नेक्सॉन ईव्ही आरामदायीपणा, विश्वसनीयता, कामगिरी, तंत्रज्ञान व चार्जिंग या आधारस्तंभांवर निर्माण करण्यात आली आहे.
झिप्ट्रॉन ईव्ही आर्किटेक्चर विविध व आव्हानात्मक भारतीय प्रदेशांमध्ये ८०० दशलक्ष किमीहून अधिक अंतर ड्राइव्ह केल्याचे सिद्ध झाले आहे. नेक्सॉन ईव्हीचे वैशिष्ट्य व विशिष्ट लाभांसह ४५३ किमीची सुधारित रेंज विनाव्यत्यय शहरांतर्गत व शहराबाहेर प्रवासाची खात्री देते.
त्वरित टॉर्क डिलिव्हरी, ईएसपीसह आय-व्हीबीएसी, हिल डिसेंट कंट्रोल, आयपी ६७ रेटेड बॅटरी पॅक व मोटर, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम, हाय ग्राऊंड क्लीअरन्स, हाय-वॉटर वेडिंग क्षमता, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो वेईकल होल्ड अशी वैशिष्ट्ये आहेत..
नेक्सॉन ईव्हीमध्ये देशातील कोणत्याही रस्त्यावर ड्राइव्हर करण्याची क्षमता आहे. मल्टी-मोड रिजेन वैशिष्ट्य विशेषत: ब्रेकिंगच्या माध्यमातून वेईकलमध्ये अधिक रेंजची भर करण्यास मदत करते.
ही वेईकल डीसी फास्ट चार्जिंग, एसी फास्ट चार्जिंग किंवा कोणत्याही १५ अॅम्पियर प्लग पॉइण्टमधून नियमित चार्जिंग अशा अनेक चार्जिंग पर्यायांमधून चार्ज करता येऊ शकते, ज्यामुळे युजरला दुर्गम भागांपर्यंत देखील ऑपरेट करता येते.
या वेईकलमधील लक्झरीअर इंटीरिअर्स जसे वेन्टिलेटेड लेदरेट सीट्स, रिअर एसी वेंट्स, ज्वेल कंट्रोल नॉबसह अॅक्टिव्ह डिस्प्ले आणि रिअर एसी वेंट्स अशा आव्हानात्मक ड्राइव्ह्सना सुलभ व आरामदायी करतात.