टाटा नेक्सॉन पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोणती कार ठरेल बेस्ट, समजून घ्या | Tata Nexon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Nexon

टाटा नेक्सॉन पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोणती कार ठरेल बेस्ट, समजून घ्या

Tata Nexon : पेट्रोल की इलेक्ट्रिक यांच्यापैकी कोणती कार खरेदी करावी याबद्दल तुमचा मनात संभ्रम असेल. तसेच दोन्ही पैकी कोणती कार खर्चाच्या बाबतीत तुम्हाला परवडेल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण Tata Nexon EV, या देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ईलेक्ट्रिक कार (Electric Car) आणि पेट्रोल व्हेरिएंट Tata Nexon ची तुलना करणार आहोत, जेणेकरुन तुम्हाला कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे याचा निर्णय घेणे सोपे जाईल.

आज आपण नेक्सॉनच्या बेस व्हेरिएंटच्या मदतीने हे समजून घेऊया, इलेक्ट्रिक कॅटेगरीत Tata Nexon EV XM आणि पेट्रोल कॅटेगरीत Tata Nexon XE पेट्रोल हे सर्वात बेसीक मॉडेल आहेत.

दोघांमधील किंमतीतील फरक

Tata Nexon ची पेट्रोल व्हर्जनची किंमत ही दिल्लीत 7.30 लाख रुपयांपासून सुरू होते. Nexon EV ची किंमत 14.24 लाख रुपयांपासून सुरू होते. अशा प्रकारे दोन्हीच्या किमतीत सुमारे 7 लाख रुपयांचा फरक आहे. त्यामुळे पेट्रोल कार खरेदी करणे नक्कीच स्वस्त आहे. पण कार खरेदीची किंमत एकदाच द्यावी लागते , तर तुम्हाला पेट्रोल आणि मेंटनंसचा खर्च मात्र पुन्हा पुन्हा भरावा लागतो.

साधारणपणे पेट्रोल कार एका लिटरमध्ये सरासरी 15 ते 20 किलोमीटर मायलेज देते, Tata Nexon बद्दल कंपनीचा दावा आहे की ती एका लिटरमध्ये 17 किमी पेक्षा जास्त प्रवास करते. आता समजा की ते सरासरी 15 किमी मायलेज देते, तर देशातील बहुतेक भागांमध्ये, पेट्रोलची किंमत 90 रुपयांच्या वर आहे, तर नेक्सॉन पेट्रोलपासून 100 किमी जाण्याचा खर्च सुमारे 600 रुपये असेल.

तर दुसरीकडे, Tata Nexon EV मध्ये 30.2kWh बॅटरी आहे. ही सुमारे 60 मिनिटांत सुमारे 80% चार्ज होते. त्याच वेळी, कंपनीचा दावा आहे की, ती एका चार्जमध्ये 250 ते 300 किमी अंतर जाते. आता देशातील विविध राज्यांमध्ये, विजेच्या वेगवेगळ्या किंमतीनुसार, नंतर पूर्ण चार्ज करण्याचा खर्च सुमारे 300 रुपये येतो. अशा परिस्थितीत 100 किमी चालवण्याचा खर्च जवळपास निम्मा होईल.

मेंटेंन्स खर्च (Maintenance Cost)

साधारणपणे, कार कंपन्या पेट्रोल आणि डिझेल कारवर कमाल 5 वर्षांची सर्व्हिस वॉरंटी देत ​​आहेत. कंपनी Tata Nexon EV XM वर 8 वर्षांची सर्व्हिस वॉरंटी देत ​​आहे. अशा प्रकारे तुमची सर्व्हिस कॉस्टमध्ये देखील बचत होते. सरीकडे, इलेक्ट्रिक वाहनाची सर्व्हिसिंग किंमत पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत 60% कमी आहे. याचा विचार केला तर पेट्रोल कार खरेदी करणे इलेक्ट्रिक कारपेक्षा स्वस्त असू शकते. परंतु इंधन, सर्व्हिस आणि ओनरशिप कॉस्ट लक्षात घेतली तर तुम्ही पाच वर्षात मोठ्या प्रमाणात बचत करु शकता.

टॅग्स :Tata MotorsAutomobile