Jio एक वर्षाचा प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2.5GB डेटा आणि बरंच काही | Jio New Prepaid Plan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jio new prepaid 2999 rupees plan offers daily 2 5gb data free calling with 1-year validity

Jio एक वर्षाचा प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2.5GB डेटा आणि बरंच काही

Jio Prepaid Plan : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Jio) आपल्या यूजर्ससाठी एक नवीन प्लान लाँच केला आहे, या प्लॅनचा रिचार्ज केल्यास तुम्हाला दर महिन्याला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका मिळणार आहे. कंपनीने हा Jio प्लॅन 365 दिवसांच्या (Prepaid Plan with One Year Validity) वैधतेसह लॉन्च केला असून, आज आपण या नवीन प्लॅनची किंमत आणि या प्लॅनसोबत मिळत असलेल्या सर्व बेनिफिट्स बद्दल तपशीलवार माहिती घेऊया..

2999 रुपयांचा प्लॅन डिटेल्स

या प्लॅनसह, कंपनी दररोज 2.5 GB डेटासह 365 दिवसांची वैधता देते, या प्लॅननुसार एकूण 912.5 GB डेटा तुम्हाला मिळेल, यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर , Jio Cinema , Jio Tv व्यतिरिक्त, Jio Cloud आणि Jio Security चा या प्लॅनमध्ये मोफत एक्सेस दिला जातो.

मिळतेय खास ऑफर

हा Jio रिचार्ज प्लॅन 20 टक्के JioMart महा कॅशबॅक ऑफर अंतर्गत रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे . त्यामुळे या प्लॅनसह रिचार्ज करणार्‍या वापरकर्त्यांना केवळ या प्लॅनचे फायदेच मिळणार नाहीत तर Jiomart वरून खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूवर 20 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.

हेही वाचा: कोरोना : संसदेतील 400 कर्मचारी, सर्वोच्च न्यायालयाचे 4 जज पॉझिटिव्ह

जिओचा 499 रुपयांचा प्लॅन

काही काळापूर्वी Reliance Jio ने Jio 499 प्लॅन देखील यूजर्ससाठी लॉन्च केला होता. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो आणि ही लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना पुढील डेटा 64 केबीपीएस स्पीडसह मिळतो. हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. त्याचबरोबर जिओ ते जिओ आणि जिओ ते इतर कंपन्या यांच्यात व्हॉइस कॉलिंग आणि त्यासह 100 एसएमएस दररोज, जिओ प्राइम मेंबरशिप देखील मिळते. हा 499 रुपयांचा प्लॅन Disney+ Hotstar च्या एक वर्षभरासाठीच्या सब्सिक्रिप्शनसह येतो. याशिवाय जिओ अॅप्सच्या जिओसिनेमा आणि जिओटीव्ही सुविधा देखील मिळतात.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
loading image
go to top