देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार महागली; जाणून घ्या नवीन किंमत | Electric Car | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tata nexon electric car New prices hikes

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार महागली; जाणून घ्या नवीन किंमत

भारतातील इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत बोलायचे झाले तर Tata Nexon ही सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. दरम्यान, टाटा मोटर्सने नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या किमती वाढवल्या आहेत. टाटाची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 25,000 रुपयांनी महागली आहे. नवीन किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची किंमत आता 14.54 लाख ते 17.15 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) दरम्यान आहे. किमती वाढल्या असूनही, Nexon EV अजूनही भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक SUV आहे.

Tata Nexon Electric भारतीय बाजारपेठेत सध्या 5 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे - XM, XZ+, XZ+ Lux, XZ+ डार्क आणि XZ+ लक्स डार्क व्हेरिएंट. एंट्री लेव्हल XM आणि XZ+ व्हेरिएंटवर महाराष्ट्र सरकारच्या EV धोरणानुलाप ऑफर केलेल्या अनुदानासाठी पात्र आहेत. त्यामुळे या कारवर ग्राहक 2.5 लाख रुपयांपर्यंतचे फायदे घेऊ शकतात, ज्यामध्ये 1 लाख रुपयांच्या अर्ली बर्ड इन्सेंटिव्हचा समावेश आहे. ही ऑफर 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे.

हेही वाचा: TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही

व्हेरिएंटनुसार टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कारच्या किंमत यादी

व्हेरिएंट - नवीन किंमत - जुन्या किंमत

XM - 14.54 लाख रुपये - 14.29 लाख रुपये

XZ+ - 15.95 लाख रुपये - 15.70 लाख रुपये

XZ+ Lux - 16.95 लाख रुपये - 16.70 लाख रुपये

XZ+ Lux Dark - 17.15 लाख रुपये - 16.90 लाख रुपये

XZ+ Dark - 16.29 लाख रुपये - 16.04 लाख रुपये

हेही वाचा: 2022 Kwid Vs Alto : किंमत अन् फीचर्समध्ये कोण आहे दमदार? वाचा डिटेल्स

टाटा मोटर्स नेक्सॉन इलेक्ट्रिकच्या लॉंग रेंज व्हर्जनवर देखील काम करत आहे, जे आधीच अनेक वेळा टेस्टींगमध्ये पाहिले गेले आहे. नवीन मॉडेल XZ+ लक्स डार्क एडिशनच्या वर असण्याची अपेक्षा आहे, ज्याची किंमत रु. 17.15 लाख आहे. नवीन मॉडेलची किंमत नियमित मॉडेलपेक्षा सुमारे 2 लाख ते 3 लाख रुपये जास्त असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, टाटा नेक्सन त्याच्या लॉंग रेंज व्हर्जनवर काम करत आहे. मात्र, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नवीन मॉडेल काही यांत्रिक सुधारणांसह मोठ्या बॅटरी पॅकसह येईल. Tata Nexon इलेक्ट्रिक कार कदाचित नवीन 40kWh बॅटरी पॅकसह येऊ शकते.

हेही वाचा: रशियाचे मेटाला प्रत्युत्तर; लवकरच Rossgram घेणार इंस्टाग्रामची जागा

Web Title: Tata Nexon Electric Car Prices Hikes By 25000 Check Tata Nexon Ev New Price List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top