
TATA Punch खरेदी करायचीये? एक लाखाच्या डाऊनपेमेंटवर कितीचा पडेल EMI? जाणून घ्या
Tata Punch Pure And Punch Adventure Car Loan EMI : कमी किंमतीत चांगला लुक आणि फिचर्स आणि पावर असणारी मायक्रो एसयूव्ही टाटा पंचला इंडियन मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे. जे लोक पूर्ण पेमेंट देऊन घेतात त्यांच ठिक आहे. पण तुम्ही फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट करूनही कार घरी आणू शकतात. जाणून घ्या सविस्तर.
जर तुम्हाला टाटा पंच फायनांन्सवर घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला सगळ्यात स्वस्त मॉडेल Punch Pure आणि तिसरा स्वस्त व्हेरीयंट Tata Punch Adventure वर कार लोन, ईएमआय आणि डाऊनपेमेंट सहित व्याजाशी निगडीत सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत.
टाटा पंचला Pure, Adventure, Accomplished आणि Creative अशा ४ ट्रिम लेव्हलच्या एकूण ३० व्हेरीएंटमध्ये आणले आहे. ज्यांची एक्स शोरुम किंमत ६ लाख रुपयांपासून ते ९.५४ लाख रुपयांपर्यंत आहे. या मायक्रो एसयूव्हीमध्ये ११९९ सीसी चं पेट्रोल इंजिन लावलेलं आहे. पंच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसहित आहे. पंचचे मायलेज २०.०९ kmpl आहे.
टाटा पंच प्युअर लोन इएमआय आणि डाऊनपेमेंट डिटेल्स
टाटा पंचचे बेस मॉडेल पंच प्युअरची एक्स शोरुम किंमत ६ लाख रुपये आणि ऑन रोड किंमत ६ लाख ६२ हजार ५९९ रुपये आहे. जर या गाडीसाठी तुम्ही १ लाखाचं डाऊनपेमेंट करत असाल तर तुम्हाला ५ लाख ६२ हजार ५९९ रुपयांचं लोन मिळेल. व्याज जर ९ टक्के आणि कालावधी ५ वर्षांचा असेल तर तुम्हाला पुढच्या ६० महिन्यांपर्यंत ११ हजार ६७९ रुपये इएमआय द्यावा लागेल.
वरील अटींनुसार टाट पंच प्युअरच्या फायनांन्ससाठी १.४० लाख रुपयांचे व्याज लागेल.
टाटा पंच अॅडव्हेंचर लोन ईएमआय आणि डाऊनपेमेंट डिटेल्स
टाटा पंचच्या तिसऱ्या सर्वात स्वस्त व्हेरिएंट पंच अॅडव्हेंचरची एक्स शोरूम किंमत ६.८५ लाख रुपये आणि ऑन रोड चार्ज ७ लाख ७३ हजार ८८३ रुपये आहे. जर तुम्ही १ लाख रुपये डाऊन पेमेंट करून फायनांन्स घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला ६ लाख, ७३ हजार ८८३ रुपये लोन घ्यावं लागेल. लोन कालावधी ५ वर्ष आणि ९ टक्के व्याजदर असेल तर १३ हजार ९८९ रुपयांपर्यंतचा ईएमआय भरावा लागेल. यात १.६५ लाख रुपये जास्तीचे व्याज द्यावे लागेल.