सर्वात स्वस्त पण सर्वात सेफ, TATA ची 'ही' SUV ठरली बेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tata punch

सर्वात स्वस्त पण सर्वात सेफ, TATA ची 'ही' SUV ठरली बेस्ट

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सच्या पहिल्या मायक्रो एसयूव्ही Tata Punch ची सेफ्टी रेटिंग (Safety Rating) समोर आली आणि या SUV ला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. एवढेच नाही तर पॉंईट्सच्या बाबतीत या कारने इतर सर्व वाहनांना मागे टाकले आहे. म्हणजेच ही एसयूव्ही भारतातील सर्वात सुरक्षित कार बनली आहे. टाटा पंच या मायक्रो एसयूव्हीते लाँच 18 ऑक्टोबर रोजी होणार असून या कारची किंमत सुमारे 5.5 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते. त्यामुळे 5 स्टार सेफ्टी रेटिंग असलेली ही कार इतर सर्व वाहनांपैकी ते सर्वात स्वस्त कार असू शकते.

Tata Punch सर्वात सुरक्षित

ग्लोबल एन्केप क्रॅश टेस्ट दरम्यान , टाटा पंचला एडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. या कारने या टेस्टमध्ये 17 पैकी 16.45 गुण मिळवले. त्याचप्रमाणे, लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, या एसयूव्हीने 49 पैकी 40.89 गुण मिळवले आहेत, ज्यामुळे या कॅटेगरीत या कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. भारतातील कोणत्याही कारने मिळवलेली ही सर्वोच्च रेटींग आहे.

बाकी गाड्यांना किती रेटींग मिळाले?

ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंगच्या यादीत बाकी वाहनांबद्दल बोलायचे झाल्यास अडल्ट सेफ्टी रेटिंग महिंद्रा एक्सयूव्ही 300 ला 17 पैकी 16.42 पॉंईट्स मिळाले, टाटा अल्ट्रोझला 16.13 पॉंईट्स मिळाले आणि टाटा नेक्सनला 16.06 पॉंईट्स मिळाले. त्याचप्रमाणे, मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत, महिंद्रा XUV300 ला 49 पैकी 37.44 पॉंईट्स मिळाले, टाटा अल्ट्रोझला 29 पॉंईट्स मिळाले आणि टाटा नेक्सनला 25 पॉंईट्स मिळाले.

हेही वाचा: Kia ने लॉंच केली सर्वात स्वस्त SUV ची स्पेशल एडिशन, पाहा किंमत

Tata Punch सेफ्टी फीचर्स काय आहेत?

टाटा पंचमध्ये सेफ्टीसाठी ड्युअल एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, कॉर्नरिंग फंक्शनसह फ्रंट फॉग लाईट्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रियर डिफॉगर आणि पंचर रिपेअर किट असे फीचर्स देण्यात आली आहेत. ही मायक्रो एसयूव्हीPure, Adventure, Accomplished आणि Creative अशा 4 व्हेरियंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. टाटा पंच बनवताना 5 गोष्टींची काळजी घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे: कमांडिंग ड्रायव्हिंग पोजिशन, हाय ग्राउंड क्लिअरन्स, स्पेस, आराम आणि ग्राहकांची सुरक्षा.

हेही वाचा: MG Astor भारतात लाँच, किंमत Hyundai Creta पेक्षा कमी

loading image
go to top