
WhatsApp Account Ban : नियम मोडल्याप्रकरणी व्हॉट्सॲपने बंद केलेत 29 लाख अकाउंट, तुम्हीही करताय ही चूक?
WhatsApp Account Ban : गेल्या महिन्यातील युजर सेफ्टी मंथली रिपोर्ट जारी करताना, व्हॉट्सॲपने जवळपास 29 लाख 18 हजार भारतीय खाती बंद केली आहेत. 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान, सुमारे 10,29,000 खाती अशी होती जी भारत सरकार आणि व्हॉट्सॲपच्या धोरणाचे उल्लंघन करत असल्यामुळे कोणत्याही अहवालाशिवाय कंपनीने बंद केली होती. तुम्हीही चुकीच्या कामासाठी व्हॉट्सॲप वापरत असाल, तर मेटा तुमच्या खात्यावरही कारवाई करू शकते. तेव्हा वेळीच सावध व्हा.
दर महिन्याला व्हॉट्सॲप यूजर अनेक खात्यांची तक्रार करतात, त्यानंतर व्हॉट्सॲप त्यांचे रिव्ह्यू करते आणि बरोबर आढळल्यास खाते कायमचे ब्लॉक किंवा बंद करते. व्हॉट्सॲप अशा प्रकारची पावले उचलते जेणेकरून प्लॅटफॉर्म यूजर्ससाठी सुरक्षित करता येईल. जगभरात 2 अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सॲप वापरतात.
डिसेंबर महिन्यात अनेक खात्यांवर बंदी घालण्यात आली होती
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपने देशातील ३६ लाखांहून अधिक खाती बंद केली होती. जानेवारीमध्ये, व्हॉट्सअॅपला वेगवेगळ्या खात्यांबद्दल सुमारे 1,461 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 1,337 वापरकर्त्यांनी खाते बंद करण्याचे आवाहन केले होते, तर इतरांवर समर्थन आणि सुरक्षिततेबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. (Banned)
लवकरच युजर्सना हा पर्याय मिळेल
व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे ज्याच्या अंतर्गत लोक स्टेटस रिपोर्ट करू शकतील. नवीन फीचरनंतर तुम्हाला कोणाचे स्टेटस योग्य वाटले नाही किंवा समोरच्या व्यक्तीने चुकीचा कंटेंट पोस्ट केला असेल तर तुम्ही लगेच व्हॉट्सअॅपवर तक्रार करू शकता. पुनरावलोकन केल्यावर, WhatsApp ते त्वरित काढून टाकेल. याशिवाय लवकरच युजर्सना स्टेटसवर व्हॉईस नोट टाकण्याची सुविधाही मिळणार आहे.