Redmi चा सर्वात स्वस्त 5G फोन; काय असेल किंमत-स्पेसिफिकेशन्स? वाचा | Xiaomi Cheapest 5G Phone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Redmi Note 11T 5G

Redmi चा सर्वात स्वस्त 5G फोन; काय असेल किंमत-स्पेसिफिकेशन्स?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Xiaomi Cheapest 5G Smartphone : Xiaomi ने Redmi Note 11T हा त्यांचा स्मार्टफोन लवकरत लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने Redmi Note 11T स्मार्टफोन Amazon India च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे, जिथून फोनची संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत समोर आली आहे. हा फोन भारतात 30 नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. Redmi Note 11T 5G स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेपासून संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल आज आपण जाणून घेणार आहेत.

काय असतील स्पेसिफिकेशन्स?

Xiaomi Redmi Note 11T 5G ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीसह लॉंच करण्यात येईल. फोनमध्ये स्विफ्ट डिस्प्ले आणि रॅम बूस्टरला सपोर्ट मिळणार असून फोन 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. Redmi Note 11T 5G मध्ये तुम्हाला 6.6 इंच FHD + डिस्प्ले सपोर्टसह ऑफर केला जाऊ शकतो. त्याचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल असेल. तसेच फोनमध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, Redmi Note 11T 5G ला 5,000mAh बॅटरी 33W चार्जिंग सपोर्टसह मिळेल. कॅमेरा बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. त्यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP असेल. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड सेन्सर दिला जाईल. तर सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा: चीनमध्ये प्रसिध्द लोक का होतात बेपत्ता? काय आहे यामागचं गुढ?

किंमत किती असेल?

Redmi Note 11T 5G चे बेस व्हेरियंट (6GB RAM आणि 64GB स्टोरेज)ची किंमत भारतात 16,999 रुपये असू शकते. तर Redmi Note 11T 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 17,999 आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 19,999 रुपये आहे.

हेही वाचा: Hyundai ची Ionic 5 इलेक्ट्रिक SUV; सिंगल चार्जवर धावेल 481 किमी

loading image
go to top