चीनमध्ये प्रसिध्द लोक का होतात बेपत्ता? काय आहे यामागचं गुढ? वाचा | Peng Shuai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

peng shuai jack ma go missing

चीनमध्ये प्रसिध्द लोक का होतात बेपत्ता? काय आहे यामागचं गुढ?

चीनची स्टार टेनिसपटू पेंग शुआई (Peng Shuai) ही एका माजी उच्च पदावरील असलेल्या सरकारी अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर बेपत्ता झाली होती, मात्र पेंग आज सकाळी बीजिंगमध्ये ज्युनियर टेनिस चॅलेंजर फायनल्सच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहीली. ती अचानक बेपत्ता झाल्यामुळे चीनला जगभरातून झालेल्या टीकेला सामोरे जावे लागले होते. दरम्यान पेंगने कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यावर केलेल्या आरोपानंतर ती गायब झाली होती. चीनमध्ये एखादी प्रसिध्द व्यक्ती बेपत्ता होण्यची ही काही पहिलीच वेळ नाही, यापुर्वी देखील अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असे अचानक बेपत्ता झालेल्या लोकांमध्ये चीनमधील अनेक राजकीय नते, करमणूक क्षेत्र काम करणारे लोक, उद्योजक अशा अनेाकांचा समावेश आहे.

सध्या अनेकांना असा प्रश्न पडला आहे की नेमकं पेंग शुईचे काय झालं? टेनिस जगतात आणि जागतिक मिडीयामध्ये याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. चिनी अधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वी ग्रँड स्लॅम दुहेरी चॅम्पियन असलेल्या पेंग यांनी ऑनलाइन पोस्टमधून केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष केले होते.

अधिकाऱ्यावर केले होते गंभीर आरोप

पेंग यांनी या पोस्टमध्ये सांगितले होते की, पक्षाच्या सर्वात शक्तिशाली पॉलिटब्युरो स्टँडींग कमेटीचे माजी उपाध्यक्ष आणि सदस्य झांग गाओली यांनी पेंग यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले होते. 2013 मध्ये विम्बल्डन आणि 2014 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावणाऱ्या माजी जागतिक नंबर वन पेंग (35) हिने तीनदा ऑलिम्पिकमध्ये देखील भाग घेतला आहे. बीजिंगमध्ये फेब्रुवारीपासून विंटर गेम्स सुरू होणार आहेत आणि त्यामुळे सध्या पेंगच्या बेपत्ता होण्याची जोरदार चर्चा होती. पेंगने 2 नोव्हेंबर रोजी एका लांबलचक सोशल मीडिया पोस्टमध्ये झांगने तीन वर्षांपूर्वी तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप केला होता.

हेही वाचा: Hyundai ची Ionic 5 इलेक्ट्रिक SUV; सिंगल चार्जवर धावेल 481 किमी

चीनमधील लोक बेपत्ता होण्याचे कारण काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वरुन त्यांच्या व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ही पोस्ट लगेच काढून टाकण्यात आली. मात्र, या खळबळजनक पोस्टचे स्क्रीनशॉट चीनमध्ये इंटरनेटवर व्हायरल झाले होते. चीन हा कायद्याने चालणारा देश आहे पण शेवटी देशावर कम्युनिस्ट पक्षाची मजबूत पकड आहे. चीनमध्ये प्रेस आणि सोशल मीडियावरील बंधने असल्याने गायब झालेल्या लोकांची नावे जगापासून गुप्त ठेवणे अधिकार्‍यांना शक्य होते. पेंगच्या आधीही, उद्योजक क्षेत्रातील नावाजलेले जॅक मा आणि लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग (Fan Bigbing) यांच्यासह अनेक प्रसिद्ध लोक अचानक गायब झाले आहेत.

जॅक मा यांनी टीका केली अन् गायब झाले

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये एका भाषणात सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती आणि तेव्हापासून ते गायब आहेत. त्यानंतर त्याना कुठेही सार्वजनिकरित्या पाहण्यात आलेले नाही. दोन महिन्यांनंतर, जानेवारी 2020 मध्ये, तो अलीबाबाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दिसले परंतु त्यांच्या बेपत्ता होण्याबद्दल त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही. फॅन बिंगबिंग देखील तिन महिने गायब होती त्यांनंतर बातमी आली की कर अधिकार्‍यांनी तिला आणि तिच्या कंपन्यांना 13 करोड डॉलर कर आणि दंड भरण्यास भाग पाडले.

हेही वाचा: पुढच्या आठवड्यात लॉंच होतायत 'हे' दमदार स्मार्टफोन्स, वाचा डिटेल्स

शी जिनपिंग यांच्यावर टीका करणे पडले महागात

त्याचप्रमाणे 2017 मध्ये व्यावसायिक महिला डुआन वेहँग बेपत्ता झाली होती. तिच्या पतीने सांगितले की चार वर्षांनंतर, जेव्हा ते चीनच्या श्रीमंत वर्गातील भ्रष्टाचार उघड करणारे पुस्तक प्रकाशित करण्याच्या तयारीत होते, तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला की ते पुस्तक प्रकाशित करू नका. रियल इस्टेट व्यावसायिक रेन झिकियांग मार्च 2020 मध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर कोरोनाव्हायरस काळात परिस्थीती हाताळण्यावर टीका केल्यानंतर गायब झाले. त्याच वर्षी नंतर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

loading image
go to top