Secret Code Tech Tips
Secret Code Tech Tips esakal

Tech Tips : Android फोन वापरणाऱ्यांना माहिती असायला हवेत असे Secret Code; फोन सेफ्टीमध्ये येतील कामी

दुकानदार सांगतोय त्यावर विश्वास न ठेवता स्वत: तपासा खरंच मोबाईल बिघडलाय की नाही ?

Tech Tips : Android फोन युजर्सना सहसा फोनचे सिक्रेट कोड माहित नसतात. Android स्मार्टफोनमध्ये सिक्रेट कोड वापरून अनेक सेटिंग पर्याय आणि माहिती अनलॉक (Unlock) केली जाते. जी तुम्हाला कदाचित याआधी माहित नसेल. जेव्हा तुम्ही फोन दुरुस्तीसाठी जाता आणि फोनचे फिचर्स (Features) जाणून घेता तेव्हा तूम्हाला त्याची माहिती दिली जात नाही.

तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा बिघडल्यास तो दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. तूम्ही दुकानात गेल्यानंतर दुकानदाराने तुम्हाला कॅमेरा बदलून दुसरा बसवावा लागेल असे सांगितले.पण, तूमच्या फोनला खरंच नव्या कॅमेऱ्याची गरज आहे का? हे कसे ओळखाल.

याच कामात तूम्हाला हे कोड मदत करतील. तुम्ही हे कोड्स वापरून फोनमध्ये झालेल्या बिघाडाबद्दल माहिती मिळवू शकता. यामूळे तुमची फसवणूक होणार नाही.

Android मध्ये दोन प्रकारचे सिक्रेट कोड आहेत: हे दोन प्रकारचे सिक्रेट कोड अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा (USSD) आणि मुख्य मशीन इंटरफेस (MMI) आहेत. USSD हा एक विशिष्ट कोड आहे जो तुम्हाला नेटवर्कबद्दल माहिती देतो. तर, MMI मॉडेल आणि ब्रँड विशिष्ट आहे. हे तूम्हाला यूएसएसडी सिम कार्ड बद्दल माहिती देते.

Android चे सिक्रेट कोड सार्वत्रिक असून ते सर्वच उपकरणांमध्ये कार्य करतात. काही हँडसेटमध्ये याबाबत निर्बंध आहेत. म्हणजेच, तुम्ही या लपलेल्या सेटिंग्जमध्ये प्रवेश करू शकत नाही. पण, बऱ्याच मोबाईलमध्ये ही सिस्टीम काम करते.

हे आहेत कोड

  • • *#0*# – या कोडमूळे तूम्ही Info menu मध्ये जाऊ शकता

  • • *#*#4636#*#* – Info menu मध्ये जाण्यासाठी हा कोडही वापरू शकता

  • • *#*#34971539#*#*- या सिक्रेट कोडमूळे कॅमेराची माहिती मिळते

  • • *#06#- हा कोड वापरून फोनचा IMEI नंबर पाहता येतो

  • • *#*#1111#*#*- या कोडमूळे FTA सॉफ्टवेयर व्हर्जन एक्सेस केलं जाऊ शकतं

  • *#*#232337#*#- यामूळे स्मार्टफोनचे ब्लुटूथ ऍड्रेस पाहिले जाऊ शकते

  • • *#*#2222#*#*- हा कोड फोनचे हार्डवेअर व्हर्जन दाखवते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com