Boost Phone Signal : प्रवासात नेटवर्क झालं गुल! Don’t Worry, अशा टिप्सनी पुन्हा मिळवा नेटवर्क!

आता तूम्ही ट्रिपला गेल्यावर घरातल्यांची काळजी मिटणार!
how to boost mobile phone signal while traveling
how to boost mobile phone signal while travelingesakal

Boost mobile phone signal : सध्याच्या लोकांना फिरण्याचं भारी वेड ‘बॅग भरो और निकल पडो’, या धर्तीवर आता कधीही उठून फिरतीचं प्लॅनिंग केलं जातं. त्यामुळेच लोकांच्या बॅग्स नेहमी तयार भरलेल्या असतात. लोक सगळी तयारी करतात पण मोबाईलची एक गोष्टीची तयारी आपल्याकडून राहून जाते. ती म्हणजे मोबाईलचे नेटवर्क.

 बाहेर ट्रेकींगला जा किंवा एखाद्या समुद्र किनाऱ्यावर. पण, मोबाईल नॉट रिचेबल असणं ही सामान्य विषय बनला आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर मोबाईलला नेटवर्क येत नाही. तेव्हा घरचे लोकही काळजी करत बसतात. तेव्हा अशावेळी काय करायचं हे पाहुयात.

how to boost mobile phone signal while traveling
World First Mobile Phone : एवढी होती जगातल्या पहिल्या मोबाईल फोनची किंमत

फ्लाईट मोडवर टाका

नेटवर्कच्या या समस्येतून तुम्हाला एक गोष्ट बाहेर काढू शकते. ती म्हणजे मोबाईल फ्लाईट मोडवर टाकणे होय. फोनचे नेटवर्क ठीक करण्यासाठी फ्लाईट मोड ऑन ऑफ करणे एक अतिशय सोपा मार्ग मानला जातो.

बहुतेक लोक ही पद्धत वापरतात. फोनचे नेटवर्क आणि इतर ऑप्शन असलेल्या स्क्रीनवरच तुम्हाला Airplane Mode चा पर्याय दिसेल. त्यावर दोनवेळ क्लिक करा आणि चमत्कार बघा.

मोबाईल फ्लाईट मोडवर टाका
मोबाईल फ्लाईट मोडवर टाकाesakal
how to boost mobile phone signal while traveling
Mobile Toilet Bus : मोबाईल टॉयलेटची वानवा

फोन रीस्टार्ट करा

आपला फोन देखील एका छोट्या कॉम्प्युटर सारखाच असतो. ते वेळोवेळी चालू आणि बंद करणे फार महत्वाचे आहे. गाडी चालवताना फोनमध्ये नेटवर्क येत असेल तर तुम्ही हे फीचर वापरू शकता.

हे नेटवर्क परत मिळवण्यासाठी मदत करेल. तुम्ही Android आणि iPhone.3 मध्ये साइड बटण वापरून फोन रीस्टार्ट करू शकता.

how to boost mobile phone signal while traveling
Mobile Ringtone : मनपसंद गाणं नाही तर तुमच्या नावाचीच ठेवा रिंगटोन, कसं ते जाणून घ्या

नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा

कधीकधी नेटवर्कमधील त्रुटी घालवण्यासाठी नेटवर्क सेटिंग्ज रिफ्रेश करणे किंवा रीसेट करणे आवश्यक असते. यामुळे अनेक प्रकारचे बग दूर होतात. Android फोनमधील नेटवर्क सेटिंग रीसेट करण्यासाठी, सेटिंगमध्ये जाऊन तिथे जनरल सेटींगवर क्लिक करा. तिथे तुम्हाला reset चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि नंतर नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा.

 आयफोनवर नेटवर्क रीसेट करण्यासाठी, सेटिंग्ज वर जा. त्यानंतर जनरल मॅनेजमेंटमध्ये. तिथे तुम्हाला reset चा पर्याय दिसेल. लक्षात ठेवा नेटवर्क सेटिंग्ज रीसेट केल्याने तुमचे WiFi पासवर्ड मिटतील.

मोबाईल रिस्टार्ट करण्याने येऊ शकतं नेटवर्क
मोबाईल रिस्टार्ट करण्याने येऊ शकतं नेटवर्कesakal
how to boost mobile phone signal while traveling
Mobile Screen Problems :मोबाईलची स्क्रीन सतत होतेय Black Out?  तूम्हीच करू शकता तिला ठिक, कसे ते पहा!

नेटवर्क बूस्टर

आजकाल प्रत्येकजण फोनमधील नेटवर्कच्या समस्येने त्रस्त आहे. या तीन पर्यायांव्यतिरिक्त, आपण इच्छित असल्यास आपण आपल्या गाडीत फोन नेटवर्क बूस्टर बसवू शकता. मोबाईल फोन बूस्टरचे काम तुमच्या फोनचे नेटवर्क वाढवणे आहे. तुम्ही प्रवास करत असाल तर हे बूस्टर जवळच्या टॉवर्सवरून नेटवर्क घेण्यास उपयुक्त ठरते.

गाडीतही मिळणार नेटवर्क
गाडीतही मिळणार नेटवर्कesakal
how to boost mobile phone signal while traveling
Watch IPL in Mobile Free: इतिहासात पहिल्यांदा मोबाईल फोनवर फ्री पाहू शकता IPL, जाणून घ्या कुठे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com